सध्या देशभरात प्राप्तीकर भरण्यासाठी पगारदार कर्मचाऱ्यांची आणि व्यावसायिकांची लगबग सुरु आहे. पगारदार कमर्चारी दरवर्षी प्राप्तीकर भरत असतात. कर भरणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी दरवर्षी कर भरतातच. त्याचे अनेक फायदे त्यांना मिळतात देखील. या लेखात आपण जाणून घेऊयात की शिक्षक, प्राध्यापकांनी आयकर का भरायला हवा, त्याचे नेमके फायदे काय आहेत…
Table of contents [Show]
राष्ट्र उभारणीतले महत्वाचे योगदान
देशात लोकोपयोगी कामे करण्यासाठी सरकारला पैशांची गरज असते. प्राप्तीकराद्वारे मिळालेल्या पैशातून सरकार सार्वजनिक हिताची कामे आणि लोककल्याणकारी योजना राबवत असते. त्यामुळे एक सजग आणि क्रियाशील नागरिक म्हणून आपण सर्वांनीच आयकर भरायला हवा. राष्ट्र उभारणीसाठी जसे आदर्श विद्यार्थी घडवून शिक्षक आपली भूमिका बजावतात तशीच भूमिका त्यांची आयकर भरताना देखील असते. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक मंडळी दरवर्षी न विसरता आयकर भरत असतात. अनेक शाळांमध्ये संस्थाचालकच सीए नेमून देत असतात, ज्यांच्या मदतीने आयकर भरला जातो.
शैक्षणिक पायाभूत सुविधांना प्राधान्य
प्राप्तिकर महसूल सरकारला शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आणि संशोधन सुविधा यांसारख्या शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण आणि देखरेखीसाठी निधी वाटप करण्यास मदत करत असतो. आपण भरलेल्या करातून शिक्षक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिक्षण व्यवस्थेला हातभार लावत असतात आणि याकामी सरकारला मदत करत असतात.
Income Tax Return भरण्यापूर्वी, ITR म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार असतात ते जाणून घ्या!https://t.co/8n9dQq2R0C
— MahaMoney (@mahamoneysocial) July 12, 2023
.#itr #IncomeTaxReturn #ITRFiling #mahamoney pic.twitter.com/73hnT5bQKE
पगाराची पारदर्शकता
आयकर भरल्याने शिक्षकांच्या वार्षिक कमाईची नोंद केली जाते. यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्ज घेताना, परदेशी जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करताना, मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना हे दस्तऐवज उपयोगी पडते. त्यामुळे नियमित आयकर भरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही.
अनेक सरकारी योजना आणि लाभ व्यक्तींना त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार उपलब्ध असतात. आयकर भरून, शिक्षकवर्ग वैद्यकीय विमा, पेन्शन योजना, अनुदानित घरे (गृहनिर्माण संस्था) आणि शैक्षणिक अनुदान यासारख्या योजनांसाठी पात्र होतात. तसेच याचा फायदा त्यांच्या पाल्यांना आणि कुटुंबियांना देखील मिळतो.
कर सवलत
सरकारी कर्मचारी असलेल्या शिक्षकांना सरकारने वेळोवेळी केलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे दरवर्षी कर भरणा करणे देखील त्यांच्यासाठी आवश्यक आहे. करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी शिक्षक विविध कर-बचत गुंतवणूक, वजावट आणि सरकारी सवलतींचा लाभ घेऊ शकतात. आरोग्य उपचारावरील खर्च, पाल्यांची शैक्षणिक फी, गृहकर्ज, घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेले कर्ज, सेवाभावी संस्थांना दिलेले दान यावर कर वजावट देखील मिळते. त्यामुळे करपात्र उत्पन्न कमी होते.
त्यामुळे आयकर भरला नसेल तर लागलीच तुम्ही देखील आयकर भरला पाहिजे. 30 जुलै 2023 ही आयकर भरण्याची शेवटची तारीख आहे. आपले संभाव्य नुकसान टाळायचे असेल तर वेळेत आयकर भरायला हवा.