Rooftop solar installations ratio has decreased: भारताने 2022 मध्ये सोलार एनर्जी निर्मितीत मोठी झेप घेतली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत तब्बल 91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे, देशाची सोलार एनर्जीची क्षमता 53 हजार 996 झाली आहे. असे सकारात्मक चित्र एकीकडे असताना, वर्षभरात रुफटॉप सोलार इन्स्टॉलेशन (Rooftop solar installation) होण्यात 1.09 गिगावॉट दिसून आली आहे, ही माहिती लोकसभेत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी दिली.
भारतात 2021 मध्ये 1.14 गिगावॉट एवढे सोलार रुफटॉप इन्स्टॉलेशन (Rooftop solar installation) झाले होते. मात्र 2022 वर्षात 1.09 गिगावॉट एवढेच इन्स्टॉलेशन झाले, याचाच अर्थ यात 4 टक्क्यांची घट झाली आहे. या संपूर्ण वर्षात भारताने सोलार एनर्जीचे उत्पादन वाढवले असताना रुफटॉप इन्स्टॉलेश कमी झाल्यामुळे बाजारात विरोधाभास दिसून येत आहे.
सोलार रुफटॉप इन्स्टॉलेशन कमी होण्याची कारणे? Reasons for Declining Solar Rooftop Installations?
- केंद्र शासनाने 2016 साली उज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना (Ujwal DISCOM Assurance Yojana) देशात आणली. ही डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रिब्युशन कंपनी होय. या योजनेअंतर्गत, रुफटॉप सोलार प्रोग्रॅम फेज 2 इन्स्टॉलेशनला मंजूरी मिळण्यास उशिर झाला असल्याचे मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले.
- 2. उज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजनेअंतर्गत (Ujwal DISCOM Assurance Yojana) बनवलेल्या सोलार मॉड्युलला, माल किंवा लागणारे सामान पुरवणाऱ्या कंपनी किंवा एजन्सी यांचे टेंडर वेळेत निघाले नाहीत, यामुळे मालाचा पुरवठा होण्यात अडथळे निर्माण झाले.
रुफटॉप सोलार इन्सटॉलेशनमध्ये (Rooftop solar installation) वाढ व्हावी यासाठी, राज्यस्तरीय योजना लागू होण्याबाबत पाठपुरवा करणे, शासकीय पातळीवरील परवानग्या लवकरात -लवकर मिळाव्यात यासाठी प्रय़त्न करणे. यासह उज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजनेत (Ujwal DISCOM Assurance Yojana) योग्य ते बदल करून, सोलार एनर्जीचा अधिकाधिक प्रसार केला जाईल, आदी मुद्द्यांवर काम करून 2022 मध्ये झालेली घट पुढील 2023 या वर्षात भरून काढणे, तसेच येत्या वर्षात रहिवासी भागात रुफटॉप सोलार पॅनल बसवण्यावर भर दिला जाईल हे उद्दीष्ट आहे, असे मंत्री आर. के. सिंह यांनी म्हटले.