Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Consumer Day: राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो? त्याची उद्दिष्टे काय आहेत?

National Consumer Day 2022

Image Source : www.retail4growth.com

National Consumer Day: ग्राहकांना त्यांचे अधिकार, कर्तव्ये, हक्क आणि जबाबदारींची माहिती करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.

भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) साजरा केला जातो. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून 24, डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला होता. त्यामुळे 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर याचा ग्राहकांनी जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून 1991, 1993, 2002 आणि 2020 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली.

ग्राहक कोण आहे? Who is Customer?

ग्राहक एक अशी व्यक्ती आहे; जी विविध वस्तू आणि सेवा वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंसाठी पैसे देते. भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेत ग्राहक हा एक महत्त्वाचा घटक आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो?

ग्राहकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये यांची माहिती असावी, या अनुषंगाने जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव करून देणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिन कसा साजरा करतात?

या दिवशी ग्राहकांच्या जनजागृतीसाठी नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, वजन-मापे निरीक्षक कार्यालय आदी विभागांमार्फत प्रबोधन, प्रात्यक्षिक, व्याख्याने आणि प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागातर्फे (Department of Consumer Affairs) दरवर्षी वेगवेगळ्यांची थीम ठरवून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 2021 मध्ये ‘ग्राहकांनो तुमचे हक्क जाणून घ्या’ या थीमवर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता.

Consumer Rights 2022

जागो ग्राहक जागो | Jago Grahak Jago

2005 मध्ये ‘जागो ग्राहक जागो’ हा भारत सरकारच्या ग्राहक आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाद्वारे सुरू केलेली ग्राहक जागरूकता मोहीम आहे. यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जाणीव निर्माण होण्यास मदत होत आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनाची उद्दिष्टे कोणती आहेत?

अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ग्राहकाला संरक्षण कायद्याद्वारे हक्क देण्यात आले आहेत. वस्तुंप्रमाणेच, मिळालेल्या हक्कांचा ग्राहकाने उपभोग घेतला तर, विनाकारण होणारे शोषण थांबून ग्राहकांचे महत्त्व अबाधित राहण्यास मदत होईल. होणाऱ्या फसवणुकीबद्दल तक्रार करण्याची जागरूकता ग्राहकांमध्ये निर्माण व्हावी, हे मुख्य उद्दिष्टे ठेवून ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.