Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Register Mobile Number with Bank Account : बँक खात्यात मोबाईल क्रमांक नोंदवणे महत्त्वाचे का आहे?

Register Mobile Number with Bank Account

रिझर्व्ह बँकेच्या (RBI – Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांनी बँक खात्यात मोबाईल क्रमांक लिंक करणे (Register Mobile Number with Bank Account) अनिवार्य केले आहे. बँक खात्यातील नोंदणीकृत मोबाइल क्रमांक हरवल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही तो सहज बदलू शकता.

आजकाल बँकेशी संबंधित बहुतांश कामे मोबाईल फोनशिवाय करणे शक्य नाही. प्रत्येकाचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडला जातो आणि या मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट, UPI, मनी ट्रान्सफर इत्यादी गोष्टी केल्या जातात. रिझर्व्ह बँकेच्या (RBI – Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांनी बँक खात्यात मोबाईल क्रमांक लिंक करणे (Register Mobile Number with Bank Account) अनिवार्य केले आहे. बँक खात्यातील नोंदणीकृत मोबाइल क्रमांक हरवल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही तो सहज बदलू शकता. आतापर्यंत तुम्हाला यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत होते, मात्र आता हे काम तुम्ही घरी बसून करू शकता. याशिवाय, ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही मोबाइल नंबरही बदलू शकता.

बँकेत मोबाईल क्रमांक नोंदवणे का आवश्यक आहे?

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि व्यवहार सुधारण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की बँकेशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरबीआयने ई-मेल आयडीही अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता ई-मेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध आहे, ज्याद्वारे फसवणुकीची थेट तक्रार करता येणार आहे. तर यापूर्वी बँकेकडून येणाऱ्या ईमेलमध्ये उत्तर देण्याचा पर्याय दिला जात नव्हता.

तरऑनलाइन व्यवहार होणार नाही

जर तुम्हाला ऑनलाइन व्यवहार करायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार ज्यांनी आपले बँक खाते मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले नाही, त्यांना यापुढे ऑनलाइन बँकिंगच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दुसरीकडे, ऑनलाइन फसवणुकीबाबत रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, जर तुम्ही फसवणुकीची तक्रार 3 दिवसांच्या आत बँकेला केली, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात 10 दिवसांत परत केले जातील.

बँकेशी संबंधित मोबाईल नंबर कसा बदलायचा?

तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर आता तुम्ही घरबसल्या सहजपणे बदलू शकता. आजकाल बहुतांश बँका ही सुविधा ऑनलाइन देतात. तुम्ही तुमच्या खात्यात ऑनलाइन लॉग इन करून हे बदलू शकता. याशिवाय, ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही मोबाईल नंबरही बदलू शकता. त्याच वेळी, तुम्ही बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमच्या खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर अपडेट करू शकता.