Digital Literacy in Banking: स्मार्टफोन सॅव्ही असलेल्यांना ऑनलाईन बॅंकिंग किंवा डिजिटल बॅंकिंग नवीन नाही. पण जे टेक्निकली तितकेसे सक्षम नाहीत त्यांनी आताच्या इंटरनेच्या काळात किमान बॅंकिंग सिस्टिम वापरता येईल एवढे डिजिटल साक्षर असणे गरजेचे आहे. कारण सध्याच्या बॅंकिंग सेक्टरचे तेच भविष्य आहे. त्यामुळे बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे. चला तर बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षर होणे म्हणजे नेमके काय? तसेच बॅंक म्हणजे काय? डिजिटल बॅंक म्हणजे काय? त्याचे फायदे काय? अशी सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
Table of contents [Show]
बँक म्हणजे काय? What is Bank?
बॅंक ही सरकारने मान्यता दिलेली वित्तीय संस्था आहे. यात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या बॅंका आहेत. बॅंकेत ग्राहकांना पैसे साठवून ठेवण्याची आणि त्यावर नियमानुसार व्याज मिळण्याची सोय उपलब्ध असते. तसेच बॅंकेकडून गरजेनुसार ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या व्यतिरिक्त ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने बॅंकेद्वारे केले जाणारे व्यवहार यांची सुविधा मिळते. भारतातील सर्व बॅंकांचा कारभार हा आरबीआयकडून नियंत्रित केला जातो.
डिजिटल बॅंक म्हणजे काय? What is Digital Bank?
डिजिटल बॅंक म्हणजे बॅंकेच्या ग्राहकांना प्रत्यक्ष बॅंकेत येण्याऐवजी दिली इंटरनेट सेवेद्वारे दिली जाणारी बॅंकिंगची सेवा. या सुविधेच्या मदतीने ग्राहक बॅंकेत प्रत्यक्ष न येता तो त्याचे व्यवहार त्याच्या सोयीनुसार करू शकतो. डिजिटल बॅंकिंगच्या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक पैसे भरणे, काढणे किंवा इतरांना ट्रान्सफर करणे, वेगवेगळी बिले भरणे, बॅंकेची एफडी सुरू करणे, बॅंकेतील जमा रक्कम तपासणे आदी विविध कामे बॅंकेत न जाता करू शकतो.
डिजिटल पेमेंट म्हणजे काय? What is Digital Payment?
एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष हातात रोख रक्कम न देता, किंवा बॅंकेतून पैसे काढून न आणता किंवा त्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी चेकबुकचा वापर न करता, लगेच त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला डिजिटल पेमेंट म्हटले जाते. या प्रक्रियेत पैसे देणारा आणि घेणारा दोघेही प्रत्यक्ष बॅंकेत जात नाहीत. तसेच ते प्रत्यक्ष पैसेही हाताळत नाहीत. पण त्यांच्यात पैशांची डिजिटली देवाण-घेवाण होते, तीही काही मिनिटांमध्ये. अशाचपद्धीने विजेचे बिल, शाळेची फी, हॉटेलमधील बिल भरली जातात. त्याला डिजिटल पेमेंट म्हटले जाते.
मग डिजिटल साक्षरता काय आहे? What is Digital Literacy?
डिजिटल साक्षरता ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठीची पूर्वतयारी आहे, असे म्हणता येईल. म्हणजेच एखादी गोष्टी वापरण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती असणे म्हणजे त्या गोष्टीबाबत साक्षर असणे. आता डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल बॅंकिंगचा वापर करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर त्यातून आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा कोणाकडून फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक होऊ नये आणि आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी डिजिटल साक्षर असणे आवश्यक आहे.
बॅंकिंग डिजिटल साक्षर होणे म्हणजे काय? Digital Literacy in Banking
यापूर्वी आपण डिजिटल बॅंकिंग आणि डिजिटल साक्षर (Digital Literacy) हे दोन्ही काय आहे. हे समजून घेतले आहे. आता या दोन्हीचा मेळ साधून बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षर व्हायचे आहे. म्हणजे बॅंकेचे जे काही ऑनलाईन किंवा स्मार्टफोनवरून व्यवहार होतात. त्याची इत्यंभूत माहिती असली पाहिजे. ते कसे करायचे? त्यात काही अडचणी आली तर त्यातून बाहेर कसे पडायचे? इतरांकडून आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून डिजिटली काय काळजी घेतली पाहिजे? हे सर्व माहिती असणे म्हणजे बॅंकिंगमध्ये डिजिटल साक्षर होणे.
डिजिटल साक्षरता अभियान | Digital Literacy Program
भारतातील अधिकाधिक नागरिक डिजिटली साक्षर व्हावेत. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान हा कार्यक्रमही सुरू केला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक घरातील/कुटुंबातील एक व्यक्ती डिजिटली साक्षर व्हावी आणि त्या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबला डिजिटल साक्षर करावे. जेणेकरून त्यांची डिजिटली आर्थिक फसवणूक होणार नाही.