Digital Bank Account: टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीला डिजिटल बँक अकाऊंट (Digital Bank Account) सोयीचे ठरते. तुमच्या सोयीनुसार बँकिंग करू शकता. कोरोनाच्या काळात निर्बंध असताना घरी बसून चांगल्या सुविधांमुळे लोक डिजिटल खाते उघडण्याकडे अधिक वळले आहेत. डिजिटल बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (Digital Banking and Mobile Banking) स्टार्टअप्स विविध योजना ऑफर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 70 टक्के भारतीयांचा कल आता डिजिटल बँकांकडे आहे, जाणून घेऊया डिजिटल बँकिंगचे फायदे आणि लक्षात घ्यावयाच्या बाबी.
Table of contents [Show]
- डिजिटल बँकिंगचे फायदे (Advantages of Digital Banking)
- डिजिटल बचत खाते ओपन करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी (Things to keep in mind while opening a digital savings account)
- बँकेचा व्याजदर (Bank interest rate)
- चार्जेस (charges)
- सोईस्कर संस्थेची निवड (Convenient organization)
- डिजिटल बचत खाते उघडताना महत्त्वाच्या गोष्टी (Important points while opening a digital savings account)
डिजिटल बँकिंगचे फायदे (Advantages of Digital Banking)
- तुमच्या सोयीनुसार बँकिंग
- मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही
- झीरो बॅलेन्स अकाऊंट (Zero Balance Account) उघडण्याची सुविधा
- मोफत मासिक ई-स्टेटमेंट E-Statement
- बिल भरणे आणि रिचार्ज सुविधा
डिजिटल बचत खाते ओपन करतांना लक्षात घ्यावयाच्या बाबी (Things to keep in mind while opening a digital savings account)
- बँकेचा व्याजदर
- चार्जेस
- सोईस्कर संस्था
बँकेचा व्याजदर (Bank interest rate)
डिजिटल खाते उघडताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बँकेचा व्याजदर. त्यामुळे खाते उघडताना तुम्हाला कोणत्या वित्तीय संस्थेत सर्वाधिक व्याज मिळत आहे हे चेक करा. वाढत्या महागाईमुळे इन्कम सोर्स असतील तेवढे कमीच आहे.
चार्जेस (charges)
जेव्हा आपण बँक अकाऊंट ओपन करतो जेव्हा आपल्याला त्या अकाऊंटमध्ये 1000 रुपये शिल्लक ठेवायला सांगतात. तसे न केल्यास बँक अकाऊंट बंद पडण्याची भीती असते. पुरेशी शिल्लक नसेल तर चार्जेस आकारले जातात. त्यामुळे अकाऊंट ओपन करतांना सर्वात कमी चार्जेस असलेले अकाऊंट ओपन केलेले चांगले.
सोईस्कर संस्थेची निवड (Convenient organization)
बहुतेक डिजिटल बचत खाती वेगवेगळ्या ऑफर्स देतात. क्रेडिट कार्ड ऑफर्स, लोन आणखी काही महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. डिपॉजिट, इन्वेस्टमेंट (Deposit, Investment) याबाबतीतही अनेक ऑफर्स लागु केले जातात. या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊन आपण आपले आर्थिक प्रॉब्लेम सोडवू शकतो. त्यामुळे बँक अकाऊंट ओपन करतांना या सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
डिजिटल बचत खाते उघडताना महत्त्वाच्या गोष्टी (Important points while opening a digital savings account)
- 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती
- 12 महिन्यांत केवायसी पूर्ण करणे बंधनकारक
- डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात (Regular savings account) अपग्रेड केले जाईल.