Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Why Heeng is So Expensive?: चिमूटभर हिंग महागड्या किमतीत का मिळतो? जाणून घ्या कारणे!

Heeng

Heeng Update: तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरण्यात येणारी हिंग कशी बनवली जाते आणि हिंगचे झाड काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चिमुटभर हिंगासाठी इतके जास्त पैसे का आकारावे लागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखात.

हिंगाची चव, सुगंध आणि फायद्यांशी आपण सर्वच परिचित आहोत. भाजीमध्ये चिमूटभर हिंग घातल्यास त्याची चव अधिक लज्जतदार बनते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठ्यामुळे देशात महागड्या किमतीत हिंग विकले जाते. यामुळेच लोक छोट्या डब्यातून हिंग विकत घेताना आपल्याला दिसतात. किराणा दुकानांमध्ये देखील अगदी 5 ग्राम, 10 ग्रामच्या डब्यांमध्ये हिंग विक्रीसाठी ठेवलेले आपल्याला आढळते. पण हिंग कसे बनवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर या लेखातून ते जाणून घ्या.

असा बनवतात हिंग (Asafoetida is made like this)

हिंग ही एक वनस्पती असून ती झाडाच्या मुळापासून बनवली जाते. हिंगाच्या झाडाची उंची 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत असते. एका रोपातून सुमारे अर्धा किलो हिंग मिळते. लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनीच हिंग काढण्यास सुरुवात केली जाते.म्हणजेच सुमारे 4-5 वर्षे रोपाची निगा राखावी लागते आणि त्यानंतरच हिंग उत्पादन होऊ शकते.हिंगाचे रोप हे मोहरीच्या रोपासारखेच दिसते. रोपाच्या मुळापासून हिंग मिळत असल्याने झाडाच्या मुळाचा एक छोटा भाग कापला जातो. झाडाला कुठलीही इजा पोहोचणार नाही आणि झाड जगेल अशी काळजी घ्यावी लागते. कारण प्रत्यक्ष उत्पादन मिळवण्याचा हिंगाचा कालावधी हा 4-5 वर्षे इतका आहे. परंतु एकदा झाडाची संपूर्ण वाढ झाली की त्यांनतर नियमित उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. 

हिंगाच्या मुळाचा जो भाग कापला जातो त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर येतो, जो गोळा केला जातो. या चिकट पदार्थात खाद्य डिंक आणि स्टार्च (तांदळाचे पीठ किंवा मैदा) घालून त्यावर प्रक्रिया केली जाते. हे मिश्रण ठराविक कालावधीसाठी उन्हात वाळवले जाते. या प्रक्रियेनंतर, लहान तुकड्यांमध्ये हिंग तयार होते. हिंगाची लागवड प्रामुख्याने इराण, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, इराक, तुर्कमेनिस्तान आणि बलुचिस्तान या देशांमध्ये केली जाते.  

हिंग लागवडीसाठी आवश्यक तापमान (Temperature required for asafoetida cultivation)

हिंगाच्या लागवडीसाठी अशी जमीन योग्य मानली जाते, ज्यामध्ये वाळू आणि चिकणमाती जास्त असते . 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान हिंग लागवडीसाठी योग्य आहे.भारतातील बहुतांश हिंग अफगाणिस्तानातून येते.  आता भारतातही हिंगाची लागवड सुरू झाली आहे. राजस्थान, काश्मीर आणि पंजाबच्या काही भागात हिंगाची लागवड सुरू झाली आहे. परंतु मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे भारताला हिंगासाठी प्रामुख्याने आखाती देशांवर अवलंबून राहावे लागते. संपूर्ण जगात हिंगाच्या उत्पादनापैकी 40% हिंग भारत वापरतो. भारतात त्याची लागवड होत नसल्यामुळे भारतात हिंग खूप महाग विकला जातो. साधारणपणे हिंगाची किंमत 30,000 ते 35,000 रुपये प्रति किलो इतकी आहे. हिंग प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो, पांढरे किंवा पिवळे हिंग आणि लाल हिंग.पांढरे हिंग पाण्यात विरघळतो तर लाल हिंग तेलात विरघळते. बाजारात हिंगाचे 3 प्रकार विकले जातात, दाणेदार हिंग, डिंक सारखी हिंग आणि विटांच्या आकाराची हिंग. संपूर्ण जगात हिंगाच्या सुमारे 130 जाती आहेत .

भारतात हिंग उत्पादन वाढीसाठी प्रयत्न (Efforts to increase asafoetida production in India)

भारतात, राजस्थानमध्ये तसेच काश्मीर आणि पंजाबच्या काही भागात हिंगाची लागवड केली जाते, परंतु भारतात हिंगाचे होणारे उत्पादन अत्यल्प असल्याने संपूर्ण भारताची मागणी पूर्ण केली जाऊ शकत नाही. भारतातील हवामान देखील हिंग लागवडीसाठी फारसे सुयोग्य नाही. त्यामुळे भारतात पिकणारे हिंग आणि आखाती देशांमध्ये पिकणारे हिंग यांच्या गुणवत्तेत फरक आढळतो. हिंगावर आयात शुल्क लागू केल्यामुळे आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असल्याने, त्याच्या किमती खूप जास्त वाढल्या आहेत. आता देशातच हिंगाचे उत्पादन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी भारतात  हिंगाची शेती म्हणावी तितकी विकसित झालेली नाही.