Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account Nominee: बँक खात्यासाठी नॉमिनी का आवश्यक आहे?

Bank Account Nominee, Bank

Bank Account Nominee: बँकेत खाते ओपन (Open a bank account) करतांना आपल्याला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स भरणे आवश्यक असते, काही वेळा असं होते की, डिटेल्स भरून देतो पण आपल्याला त्याबाबत काही माहिती नसते. नॉमिनी का महत्वाचा असतो, हे माहित करून घेऊया.

Bank Account Nominee: बँकेत खाते ओपन करतांना दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना  नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स  भरणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अनेकांना बँक खात्यातील नॉमिनीचे महत्त्व माहीत नाही. नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स  (Details of nominee) कोणत्याही बँक खात्यात भरले जातात जेणेकरून खातेदाराच्या मृत्यूनंतर, त्याच्या खात्यात जमा केलेली सर्व रक्कम नॉमिनी व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात नॉमिनीची डिटेल्स भरली  नाही आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे काढण्यात अनेक अडचणी येतात.

नॉमिनी कोणाला बनवू शकता? (Who can make a nominee?)

तुम्ही तुमचे पालक, मुले, पती/पत्नी किंवा भावंडांना तुमच्या बँक खात्यासाठी नॉमिनी बनवू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी तुमच्या खात्यासाठी नॉमिनी करता, तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या खात्यात जमा केलेली सर्व रक्कम त्या व्यक्तीला सहज दिली जाते. 

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी केले नाही, तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम तुमच्या कायदेशीर वारसांकडे (legal heir)  जाईल, ज्यामध्ये तुमची मुले आणि जोडीदार यांचा समावेश आहे. परंतु, ही प्रक्रिया खूप लांब आहे ज्यासाठी बराच वेळ लागतो. अशा वेळी तुमच्या छोट्याशा चुकीमुळे, तुमच्या अनुपस्थितीत, तुमच्या कुटुंबाला गरजेच्या वेळी पैसे मिळत नाहीत आणि त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

आधी नॉमिनी नसेल तर तुम्ही आतासुद्धा नॉमिनी बनवू शकता? (Can you make a nominee now if not a nominee before?)

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी बनवले नसेल तर उशीर न करता कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी बनवा. तुम्ही तुमचे बँक खाते नामांकित करण्यासाठी नेट बँकिंग वापरू (Use net banking) शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन एखाद्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्यासाठी नॉमिनी बनवू शकता. 

खाते धारकाच्या मृत्यूनंतर ATM द्वारे पैसे काढता येऊ शकते पण तो गुन्हा आहे. मृत्यू नंतर बँकमध्ये कागदपत्रे  जमा करून कायदेशिररित्या त्या खात्यातील पैसे काढता येऊ शकतात. एटीएम द्वारे पैसे काढल्यास तो गुन्हा समजला जातो.