Savings Account Benefits: बॅंकेत खाते उघडल्यानंतर प्रत्येकाची सुरूवात बचत खात्यानेच होते. त्यामुळे बचत खाते गुंंतवणुकदारांचे पहिले खाते असते असे म्हणायला हरकत नाही. कारण, या खात्याचा वापर करुन गुंतवणुकदार त्यांचे व्यवहार आणि पैसे मॅनेज करतो.
याशिवाय बचत खात्याचा वापर करुन जास्तीतजास्त रिटर्न कसा मिळवता येईल. हे कोणालाच माहिती नसते. पण, बॅंका बचत खात्यावर देत असलेल्या व्याजदराच्या आधारे, असे अनेक मार्ग आहेत जे तुम्हाला जास्त रिटर्न मिळवून देऊ शकतात. मात्र, यासाठी प्लॅन ठरवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
अधिक व्याजदर देणाऱ्या बॅंका पाहा
तुम्हाला काहीच न करता जास्त पैसा मिळवायचा असेल आणि कधीही तो काढता यायला हवा असल्यास बचत खात्यात गुंतवणूक करा. म्हणजे जी बॅंक चांगला व्याजदर देत आहे अशाच ठिकाणी पैसे गुंतवा. कारण, बऱ्याच बॅंका 7 टक्क्यांच्या जवळपास व्याजदर देतात. त्यामुळे तुमची कमाई दुप्पट करायची असल्यास तुम्ही हा पर्याय निवडू शकता.
ऑटो-स्वीप सुविधेचा करा वापर
तुम्ही दुसरा पर्याय ऑटो-स्वीप सुविधेचा घेऊ शकता. या सुविधेचा लाभ घेतल्यास तुमच्या बचत खात्यातील अतिरिक्त पैसे आपोआप फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर होतील. त्यामुळे तुमचा महिन्याचा खर्च आणि अन्य खर्चांची सांगड घालून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील शिवाय तुम्हाला जास्त रिटर्न ही मिळवता येईल.
खात्यात ठेवा हाय बॅलन्स
तुम्हाला अजून जास्त रिटर्न मिळवायचा मार्ग म्हणजे खात्यात जास्त बॅलन्स ठेवणे. तुम्ही जर खात्यात जास्त बॅलन्स म्हणजे हाय बॅलन्स ठेवल्यास बॅंका त्यावर तुम्हाला अधिक रिटर्न देतात. ही गोष्ट लक्षात ठेवून जास्तीतजास्त मासिक बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करा. कारण, बऱ्याच बॅंका तुमच्या रकमेच्या आधारावरही अधिक व्याजदर देतात.
डेबिट कार्डाचा घ्या लाभ
हा पर्याय सर्वात खास आहे. कारण तुम्हाला मिळणाऱ्या बचत खात्याच्या डेबिट कार्डद्वारे तुम्ही अनेक सवलती, बेनिफिट्स, रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफर्स मिळवू शकता. याचा योग्य वापर केल्यास तुम्ही दीर्घ काळासाठी चांगली रक्कम वाचवू शकता. यामध्ये तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी कार्डाचा वापर करुन त्यावर चांगले रिवार्ड आणि अन्य बॅकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता. यामुळे देखील तुमचे पैसे बचत व्हायला खूप मदत होऊ शकते.