Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

युएईने भारतीय गव्हाची निर्यात का बंद केली?

UAE Bans Indian Wheat

युएईने (UAE) पुढील चार महिन्यांसाठी भारतातून आयात केलेला गहू आणि पीठ निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घातली आहे. यूएईमध्ये आलेला भारतीय गहू निर्यात किंवा पुनर्निर्यात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना युएईच्या अर्थ मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

UAE Bans Indian Wheat : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) भारतातून आयात केलेला गहू (Wheat Import) आणि गव्हाचे पीठ (Wheat flour) निर्यात (Wheat Flour Export) करू नये, अशी भारताने मागणी केली होती. त्यानुसार युएईने (UAE) पुढील चार महिन्यांसाठी भारतातून आयात केलेला गहू आणि पीठ निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घातली आहे.

भारताने गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. जागतिक बाजारपेठेतील गव्हाचा तुटवडा आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक किमतीत वाढ होऊ नये यासाठी भारताने गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारताने देशातील अन्न सुरक्षा निश्चित करून मागणीनुसार गव्हाची निर्यात करण्याचा मार्ग ही खुला ठेवला होता. भारताच्या 14 मे रोजीच्या निर्यातबंदीनंतर यूएईने हे पाऊल उचलले आहे. परिणामी भारतीय गहू यूएईमार्गे इतर देशांमध्ये जाऊ शकत नाही. संपूर्ण जगात गव्हाची मागणी असताना यूएई सरकारच्या अर्थ विभागाने (Finance Department, UAE) भारतातून आयात केलेला गहू आणि गव्हाचे पीठ यांची निर्यात आणि पुनर्निर्यात पुढील चार महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. युएई सरकारने सर्व प्रकारच्या गव्हाच्या प्रकारांवर आणि त्याच्यापासून बनवण्यात आलेल्या पिठावर बंदी घातली आहे. 13 मेपूर्वी यूएईमध्ये आलेला भारतीय गहू निर्यात किंवा पुनर्निर्यात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना युएईच्या अर्थ मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर निर्यात करता येणार आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) हा देश स्वत:ची संपूर्ण गरज आयातीतून भागवतो. दरवर्षी 15 लाख टन गहू युएई आयात करते आणि बहुतांश गहू हा रशिया, कॅनडा, युक्रेन आणि ऑस्ट्रिलियामधून आयाता होतो. गेल्यावर्षीपासून भारताकडूनही गव्हाची आयात वाढवण्यात आली होती. भारताने 2021-22 मध्ये युएईला 4.71 लाख टन गहू निर्यात केला होता. त्याची किंमत 136.53 दशलक्ष डॉलर होती. या निर्यात केलेल्या गव्हाचे प्रमाण भारतासाठी मोठे नसले तरी, युएईसाठी लहान नाही. यातून भारत एक प्रमुख गहू निर्यातदार देश म्हणून पुढे येऊ शकतो.    

जरी निर्यात केलेले प्रमाण भारतासाठी इतके मोठे नसले तरी ते UAE साठी लहान नाहीत. दरम्यान, जुलैपासून रशियन आणि युक्रेनमधील गहू बाजारात आल्यावर गहू पुरवठ्याची स्थिती सुधारू शकते, असे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.