Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृह कर्ज महाग झाल्यावर घर खरेदी करावे का?

banking home loan interest

महागाई वाढत असताना आणि रिअल इस्टेट बाजार बदलत असताना घर खरेदी करण्याचा निर्णय हे एक धोकादायक आर्थिक पाऊल ठरू शकते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महिन्याभराच्या कालावधीत रेपो दरात एकूण 0.90 बेसिस पॉईंटने वाढ केली. यापूर्वी आरबीआयने (RBI) 4 मे रोजी 0.40 आणि 8 जून रोजी 0.50 बेसिस पाईंटने रेपो दरात वाढ (Repo Rate Increase) केली आहे. यामुळे देशातील महत्त्वाच्या बॅंका, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि स्टेट बॅंक इंडियासह इतर अनेक गृह कर्ज (Home Loan) देणाऱ्या बॅंकांनी कर्जाचे व्याज दर (Housing Loan Rates 2022) वाढवले आहेत. होम लोनचे व्याज दर वाढल्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आरबीआयने बुधवारी दि. 8 जून रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्याने त्याचा परिणाम प्रामुख्याने रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल आणि बँका या तीन क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक फटका रिअल इस्टेट (Real Estate Housing Loan Rates 2022) क्षेत्राला बसणार आहे. कारण बहुतांश घरांची विक्री ही गृहकर्जाच्या (Home Loan) मदतीने होते. त्यात आरबीआयने (RBI) रेपो दरात वाढ केल्याने नवीन गृहकर्जाबरोबर जुन्या कर्जदारांच्या व्याजदरात ही वाढ झाल्याने एकूणच गृहकर्ज घेतलेले आणि घेणाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण यामुळे महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार असून अनेक गोष्टींचा ताळमेळ साधण्यात सर्वसामान्यांची तारांबळ उडत आहे.


‘ईझी मनी’चे पर्व संपले

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, देशातील ‘ईझी मनी’चे (Easy Money) पर्व संपले. आरबीआयने वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. व्याज दर वाढीचे हे चक्र काही काळ असेच चालू राहील. 7 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराचे गृहकर्ज हे पर्व आता संपणार आहे.

housing loan rates 2022

घर खरेदीदारांबरोबर विकासकांनाही फटका

आतापर्यंत बॅंकांचे व्याजदर आटोक्यात होते. कोरोना महामारीच्या काळात घरांच्या विक्रीचा वेग मंदावला होता. पण घरांची विक्री बऱ्यापैकी होत होती. त्याला आता मोठ्या प्रमाणात खीळ बसण्याची शक्यता आहे. कारण बॅंकांचे कर्ज फक्त ग्राहकांसाठीच नाही तर बिल्डरांसाठीही महाग (Real Estate Housing Loan Rates 2022) होणार आहे. त्यामुळे एकूण घरांच्या निर्मितीचा आणि खरेदीचा दोन्हीच्या खर्चात वाढ होत आहे.

घर खरेदीचं बजेट वाढवायला हवं का?

गृहकर्जाचे व्याजदर आणि घरांच्या किमतीमध्ये वाढ होत असताना, बजेट वाढवायला हवे का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण, अशावेळी बजेट वाढवण्याचा विचारही मनात आणू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण जेव्हा घराच्या आणि व्याजदराच्या किमती वाढतात. तेव्हा घर खरेदी करण्याचा निर्णय टाळलेलाच योग्य ठरू शकतो. महागाई वाढत असताना आणि रिअल इस्टेट बाजार बदलत असताना घर खरेदी करण्याचा निर्णय हे एक धोकादायक आर्थिक पाऊल ठरू शकते. कारण अशा परिस्थितीत गृह कर्ज घेतल्यानंतर तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा मोठा आर्थिक ताण आला किंवा अचानक उद्भवलेल्या कारणांमुळे वैद्यकीय खर्च आला, तर तो कसा भागवणार? आणि नशिबाने असा कोणताच वाईट प्रसंग तुमच्यावर आला नाही. तरीही प्रत्येक महिन्याला पुरेशी बचत करण्यासाठी, आत्पकालीन निधी जमा करण्यासाठी, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जमापुंजी तयार करण्यासाठी प्रत्येक महिन्याला पुरेशी रक्कम हवी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत घर खरेदी करण्याचा निर्णय काही दिवस स्थगित करावा.

पण काही कारणांमुळे तुम्हाला घर खरेदी करायचेच असेल तर तुम्ही स्वत:ला एक नियम घालून घ्यावा. तो म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम घरांवर खर्च करू नये. महागाईच्या काळात महिन्याचे बजेट बसवताना अनेकवेळा तारंबळ उडत असते. महागाईमुळे नेहमीच्या किरणामालाच्या बिलामध्ये वाढ होते. विजेची बिलं वाढतात. सध्या तुम्ही या गोष्टींवर खर्च करू शकता याचा अर्थ असा नव्हे की, पुढच्यावर्षीही तुम्ही हा खर्च करू शकाल. कारण त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वाढत्या खर्चाचा विचार करून प्रत्येक महिन्याला पुरेशी बचत करण्याला प्राधान्य द्यायला हवे.