• 04 Oct, 2022 15:45

बिटकॉईन तयार करणारेच का विकत आहेत?

बिटकॉईन तयार करणारेच का विकत आहेत?

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) पडत आहे. अनेक गुंतवणूकदार आपापले कॉईन्स (Coins) मोठ्या प्रमाणात विकत आहेत. सर्व कॉईन्सची किंमत 4 वर्षांपूर्वी जेवढी होती; तेवढीच आता झाली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) पडत आहे. अनेक गुंतवणूकदार आपापले कॉईन्स (Coins) मोठ्या प्रमाणात विकत आहेत. सर्व कॉईन्सची किंमत 4 वर्षांपूर्वी जेवढी होती; तेवढीच आता झाली आहे. पडत्या क्रिप्टोकरन्सी मार्केटचे परिणाम बिटकॉईन तयार करणाऱ्या कंपन्यांवरही (Miners) होत आहे. कॉईन तयार करून फायदा होत नसल्याने हे मायनर्स (Miners) बिटकॉईनमधला स्वत:चा हिस्सा विकू लागले आहेत. बिटकॉईन मायनर्सकडून होत असलेल्या या विक्रीबद्दल सविस्तर जाणून घेण्याआधी मायनिंग म्हणजे काय? (What is Mining?) हे समजून घेणं आवश्यक आहे.


मायनिंग म्हणजे काय? | What is Mining?

बिटकॉईन मायनिंग (Bitcoin Mining) म्हणजे नवीन व्यवहारांची, बिटकॉईन डिजिटल चलन (Bitcoin Digital Currency) प्रणालीशी पडताळणी करून पाहणे. या प्रक्रियेद्वारे नवीन बिटकॉईन (Bitcoin) मार्केटमध्ये येत असतात. बिटकॉईन मायनिंग करण्यासाठी उच्च क्षमतेच्या संगणकांची (High Power Computer) गरज असते. हे संगणक (कॉम्युटर) अवघड गणितीय समस्या सोडविण्यासाठी वापरले जातात. या गणितीय समस्या बिटकॉईन अल्गोरिदमचा भाग आहे; या अवघड गणितीय समस्या सोडवल्यामुळे ब्लॉकचेन खातेवही (Blockchain Ledger) आणि नेटवर्क सुरक्षित राहते. यावरून तुम्हाला मायनिंग म्हणजे काय? आणि त्याची गरज का असते? याचा अंदाज आला असेलच. आता आपण मुख्य विषयाकडे वळुयात.

सार्वजनिकरीत्या बिटकॉईन माईन (Mine) करणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे मे महिन्यातील बिटकॉईनचे उत्पादन (Bitcoin Production) 100 टक्के विकले आहे. सहसा या विक्रीचा दर उत्पादनाच्या 20 ते 40 टक्के एवढा असतो. एकूण हॅशरेट (Hashrate) नेटवर्कमध्ये 20 टक्के भाग हा सार्वजनिक बिटकॉईन मायनिंग (Mining ) करणाऱ्या कंपन्यांचा तर उरलेला 80 टक्के भाग हा खाजगी बिटकॉईन मायनिंग (Bitcoin Mining ) करणाऱ्या कंपन्यांचा आहे. हॅशरेट म्हणजे प्रूफ-ऑफ-वर्क (Proof-of-Work) क्रिप्टोकरन्सी नेटवर्कसाठी (Cryptocurrency Network) वापरण्यात येणाऱ्या संगणकीय ऊर्जेचा दर. सार्वजनिक बिटकॉईन मायनिंग कंपन्यांच्या (Public Bitcoin Mining Company) विक्रीमुळे  खाजगी बिटकॉईन मायनिंग कंपन्यांवरही (Private Bitcoin Mining Company) परिणाम होतो आहे.

मायनर्सकडे (Miners) 8 लाख बिटकॉईन असतात. ज्यामुळे ते मार्केटमधील बिग बुल मानले जातात. यातील 46 हजार बिटकॉईन सार्वजनिक बिटकॉईन मायनिंग करणाऱ्या कंपन्यांकडे आहेत. या कंपन्यांनी ही ते विकल्याने मार्केट अजून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक बिटकॉईन मायनिंग कंपन्यांच्या या विक्रीमागचे प्रमुख कारण म्हणजे बिटकॉईनचे न परवडणारे उत्पादन. जगात महागाई वाढत असल्याने ऊर्जेची किंमत देखील वाढत आहे. मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता असल्यामुळे नवीन बिटकॉईन उत्पादन अतिशय महाग होत आहे. पडत्या मार्केटमुळे या कंपन्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. न होणार फायदा व नवीन उत्पादनास लागणार खर्च यांचा मेळ या कंपन्यांना घालता येत नसल्याने, विक्री हा शेवटचा उपाय त्यांना दिसत आहे. सार्वजनिक बिटकॉईन मायनिंग कंपन्यांच्या या विक्रीमुळे क्रिप्टो मार्केट पडत आहे आणि भविष्यात अजून पडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.