Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो मार्केट कोसळतंय गुंतवणूकदारांनी काय करावे?

crypto-prices-collapse-down-turn-bitcoin-cryptocurrency-value-drop-bear-market-concept

Crypto Market Crash : क्रिप्टो मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Volatility) पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) असतील तर तुम्ही काय कराल?

क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळत (Cryptocurrency Market Crash) आहे; अशावेळी तुमच्याकडे काही क्रिप्टोकरन्सी असतील तर काय करायला हवे. याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

शांत राहणे (Keep calm)

जरी तुम्ही तुमचे क्रिप्टो चलन विकणार असाल किंवा या पडलेल्या मार्केटमध्ये भविष्याच्या दृष्टीने अजून खरेदी करणार असाल, तर सर्वप्रथम डोकं शांत ठेवून विचार करा, घाईघाईत निर्णय घेऊ नका. क्रिप्टो काय किंवा शेअर्स काय? शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करताना भावुक होऊन निर्णय घेणं, अतिशय महागात पडू शकतं.

परिस्थितीचं मूल्यांकन करा (Evaluation of the situation)

खरंच मार्केट कोसळतंय का? त्याची नेमकी कारणं काय आहेत? की फक्त बातम्यांमुळे मार्केट पडतंय का? याचा आढावा घेणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचवेळा चुकीच्या बातम्यांमुळे मार्केटला मोठ्या उलाढालीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मार्केटबाबतची योग्य आणि खरी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.


क्रिप्टोकरन्सीचे दुसरे नाव अस्थिरता (Cryptocurrency and Volatility)

क्रिप्टोकरन्सीमध्ये पैशाचा फ्लो नसल्याने गुंतवणूकदार मार्केटमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे असेट्स (Assets) असतात, ज्यात प्रचंड अस्थिरता (Volatility) असते, तेव्हा अनेक गुंतवणूकदारांच्या भावुक होऊन केलेल्या चुकांचे परिणाम मार्केटमध्ये पाहायला मिळतात. याच अस्थिरतेचा फायदा काही व्यावसायिक गुंतवणूकदार घेतात. व्यावसायिक गुंतवणूकदार हाय पॉवर अल्गोरिदम्सच्या (High Power Algorithm) वापराने अशाप्रकारच्या अस्थिरतेचा फायदा उचलतात.

भविष्याचा आढावा (Future Review)

क्रिप्टो मार्केट आणि एकूणच ग्लोबल मार्केटमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि त्यांचा होणार परिणाम किती दिवस टिकेल? भविष्यात परिस्थिती चांगली होईल की अजून बिकट होईल याचा आढावा विविध तज्ज्ञांकडून वेळोवेळी घेतला जातो. त्याची माहिती ठेवणं अतिशय महत्त्वाचे आहे.

होल्ड करायचे की विकायचे? (Hold or Sell)

एखादे चलन किंवा शेअर्स होल्ड करायचे की विकायचे हा गुंतवणूकदाराचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. पण असा निर्णय घेताना गुंतवणूकदाराने भावनेच्या भरात किंवा ऐकीव माहितीच्या आधारे निर्णय घेऊ नये. शांतपणे मार्केटमधील विविध घडामोडींचा आढावा घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

गुंतवणूकदाराने कोणताही निर्णय घेताना काही प्रश्न स्वत:ला विचारून त्याची उत्तरे आपल्याकडे आहेत का? याचा अंदाज घेणं गरजेचं आहे. जसे की, ही जोखीम संधीमध्ये परावर्तीत होऊ शकते का?  परिस्थिती सुधारेल की आणखी बिकट होईल? सध्याचा आहे तो तोटा किंवा फायदा स्वीकारून बाहेर पडू का? अशा काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ असतील तर तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण मार्केटची भविष्यातील स्थिती कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेणं उचित ठरू शकतं.