Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टोकरन्सी मार्केट का पडतंय?

crypto-prices-collapse-down-turn-bitcoin-cryptocurrency-value-drop-bear-market-concept

2022 या वर्षात क्रिप्टोकरन्सीचे जागतिक पातळीवरील भांडवल (Market Capitalization) 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7 लाख 81 कोटी रूपयांनी कमी झाले. जवळपास सर्वच क्रिप्टो चलन त्याच्या नेहमीच्या उच्चांकाच्या अर्ध्या किमतीवर आल्या आहेत.

क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) या वर्षात सर्वांत जास्त पडले. 13 जून रोजी क्रिप्टोमार्केट पडले, तेव्हा क्रिप्टोकरन्सीचे ग्लोबल मार्केट कॅपिटलायझेशन 1.11 ट्रिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 8 लाख 58 हजार कोटी रूपये) वरून थेट 1.02 ट्रिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 7 लाख 97 हजार कोटी रूपये) एवढे पडले. यात मार्केट जवळजवळ 12 टक्क्यांनी पडले होते. 2022 या वर्षात क्रिप्टोकरन्सीचे जागतिक पातळीवरील भांडवल (Market Capitalisation) 1 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7 लाख 81 कोटी रूपयांनी कमी झाले. जवळपास सर्वच क्रिप्टो चलन त्याच्या नेहमीच्या उच्चांकाच्या अर्ध्या किमतीवर आल्या आहेत. क्रिप्टोकरन्सी मार्केटचा वॉल्युम (Volume) गेल्या 2 ते 3 दिवसांत सुमारे 27 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. वॉल्युम म्हणजे कॉईन्समध्ये झालेली देवाण-घेवाण किंवा खरेदी-विक्री. ही वाढलेली देवाण-घेवाण किंवा खरेदी-विक्री गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात क्रिप्टो चलन विकत असल्यामुळे दिसत आहे.


क्रिप्टो मार्केट (Crypto Market) अचानक पडण्यामागे नेमकं कारण काय आहे? गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात क्रिप्टो चलनाची विक्री होत आहे. गुंतवणूकदार जोखमीच्या गुंतवणुकीमधून बाहेर पडत आहेत. याचा परिणाम जागतिक मार्केटवर (Global Market) सुद्धा पाहायला मिळत आहे.

क्रिप्टोकरन्सी मार्केट पडण्यामागची कारणे काय आहेत?

अचानकपणे क्रिप्टो मार्केट कोसळण्यामागे 3 कारणे असण्याची शक्यता वर्तवली जाते. 

1. वाढते व्याज दर (Rising interest rates)

अमेरिकन फेडरल ओपन मार्केट समिती (federal open market committee) ने फेडरल फंडस् रेट्स जाहीर केले होते. या दरामध्ये असलेल्या वाढीचा परिणाम संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्था (US Economy), जागतिक स्टॉक मार्केट (Global Stock Market) आणि जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटवर (Global Crypto Market) होत आहे. फेडरल फंडस् दर (federal funds rate) म्हणजेच व्याज दर (interest rate). गुंतवणूकदार गुंतवणूक करताना या व्याज दरांचा अभ्यास करून गुंतवणूक करत असतात. जेव्हा व्याज दर वाढवले जातात; तेव्हा त्याचा वाईट परिणाम मार्केटवर पाहायला मिळतो. तसेच जेव्हा दर कमी केले जातात; तेव्हा त्याचा चांगला परिणाम मार्केटवर पाहायला मिळतो.

2. वाढती महागाई (Rising inflation)

भारताचा विचार करता महागाईमुळे डॉलरचे मूल्य वाढते आणि रूपयाचे कमी होते. अशावेळी गुंतवणूकदार काही विशिष्ट असेट्समध्ये (Assets) गुंतवणूक करतात; ज्यामध्ये वाढत्या महागाईसोबत फायदाही वाढत राहील. 2021 मध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या उलाढालीमुळे अनेकजण क्रिप्टोकरन्सीकडे आकर्षित झाले. बहुतेकजणांनी इतर असेट्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासा सुरूवात केली. पण गेल्या वर्षभरात क्रिप्टोमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. ज्यामुळे क्रिप्टोकरन्सी महागाईला मागे सारून फायदा मिळवून देण्यात अयशस्वी ठरत आहे. नोव्हेंबर, 2021 मध्ये बिटकॉईनने 69 हजार डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. भारतीय चलनात सांगायचे झाले तर 53,85,453.45 रूपये. त्यानंतर बिटकॉईनची किंमत पडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत बिटकॉईनची किंमत त्याच्या उच्चांकाच्या 57.02 टक्क्यांनी पडली आहे.

3. युक्रेन-रशिया युद्ध (Ukraine-Russia war)

युक्रेन आणि रशिया यांच्यादरम्यान सुरू असलेले युद्ध आणि रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीमुळे जागतिक मार्केटमध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत. युक्रेन आणि रशिया, विशेषत: युक्रेन हा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे युद्धाचा वाईट परिणाम क्रिप्टोकरन्सी मार्केटवर दिसून येत आहे.

क्रिप्टोकरन्सीचे सध्याचे दर 

बिटकॉइनची किंमत (Bitcoin Price) गेल्या 24 तासांत 2.02 टक्क्यांनी पडली आहे. गुरूवार 16 जून रोजी बिटकॉईनची किंमत 22,118.11 डॉलर्स (भारतीय चलनात 17,27,214.27 रूपये) आहे. गेल्या आठवडाभरात बिटकॉईनची किंमत सुमारे 27.30 टक्क्यांनी पडली.

गेल्या 14 महिन्यामध्ये इथेरियमने (Ethereum) त्याच्या आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळी गाठली आहे. आताची किंमत 1194 डॉलर्स (भारतीय चलनात 93,222 रूपये) आहे.

सोलाना क्रिप्टो (Solana Crypto) सुमारे 10 ते 12 टक्क्यांनी घसरली असून त्याची किंमत आता 33 डॉलर्स (भारतीय चलनात 2576 रूपये) झाली आहे.

क्रिप्टो मार्केट सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळत आहे; अशावेळी तुमच्याकडे काही क्रिप्टो चलन असतील तर काय करायला हवे. याबाबत क्रिप्टो मार्केट कोसळतंय गुंतवणूकदारांनी काय करावे? अधिक जाणून घ्या.