Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G Network: भारताच्या आर्थिक विकासासाठी 5G का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

5g

डिजिटायझेशन (Digitization) हा केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आता भारतात 5G तंत्रज्ञान लाँच करण्यात आले आहे. देशात 5G नेटवर्क आता हळूहळू विस्तारत चालले आहे. पण तरीही ग्राउंड लेव्हलवर 5G रोलआउटबाबत (5G Rollout) अनेक आव्हाने समोर येत आहेत. ज्यामध्ये पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासह इतर अनेक गोष्टींवर काम करणे बाकी आहे.

Deloitte चे ग्लोबल कन्सल्टिंग लीडर सॅम बालाजी (Sam Balaji) आणि Deloitte India चे सीईओ रोमल शेट्टी (Romal Shetty) यांनी 5G रोलआउट संदर्भात माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी भारताच्या आर्थिक विकासात 5G का महत्त्वाचा आहे हे सांगितले. याशिवाय 5G शी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. चला तर मग जाणून घेऊया,भारतीय अर्थव्यवस्था आणि 5G नेटवर्कचा परस्पर संबंध.

भारतात 5G रोलआउटबाबत यावेळी काही अडथळे येत आहेत. उदाहरणार्थ, भारतात प्रति व्यक्ती फायबर किलोमीटरचे प्रमाण सध्या कमी आहे. याबाबत रोमल शेट्टी म्हणाले की, जोपर्यंत  आपल्याकडे चांगले वायरलेस तंत्रज्ञान नसेल आणि संपूर्ण पायाभूत सुविधा नसेल, तोपर्यंत आपण 5G सेवा प्रत्यक्षात आणू शकत नाही. ते म्हणाले की 5G चा एक महत्त्वाचा भाग हा व्यवसाय मॉडेल हा आहे. 3G किंवा 4G चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कनेक्टिव्हिटी (Connectivity) पण त्यासाठी नेटवर्किंगचे बिझनेस मॉडेल सक्षम करणे खूप कठीण झाले आहे.

उदाहरणार्थ, जर स्मार्ट कंपनी तयार करायची असेल, तर तुम्ही हे 4G प्लॅटफॉर्मवर करू शकत नाही. यासाठी तुम्हाला कदाचित ब्रॉडबँडची आवश्यकता असेल. म्हणूनच 5G सक्षम असणे आवश्यक आहे. फायबरसह देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारली तरच 5G रोलआउटची खरी क्षमता लक्षात येऊ शकते, म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अजूनही भारतात अनेकांना बेसिक फोन हवा असतो त्यांना स्मार्ट फोन नको असतो. त्याचा कुठेतरी साक्षरतेशीही संबंध आहे. या प्रकाराबाबत रोमल शेट्टी म्हणाले की, आपल्याकडे देशात आधीच 350 ते 400 दशलक्ष स्मार्टफोन आहेत. असे मानले जाते की 2026 मध्ये हा आकडा एक अब्ज पार करेल. यासोबतच आता स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आले आहेत, ज्याला लोक पसंती देत आहेत.

कोविड महामारीच्या काळात कोविडविषयी जनतेला माहिती देणारे कार्यक्रम WhatsApp आधारित प्लॅटफॉर्मवर चालवले गेले होते. फीचर फोन, स्मार्ट फोनमुळे हे सगळे नियोजन व्यवस्थित करता आले. आज संपूर्ण देशातील प्रत्येक घरात डिजिटल तंत्रज्ञान पोहोचत आहे, हा भारतासाठी एक विक्रम आहे. यासोबतच ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठे 5G रोलआउट भारतात झाले आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात 5G तंत्रज्ञान मदत करणार आहे. गावोगावी स्मार्ट फोनचा वाढता वापर लोकांना डिजिटल साक्षरतेसह आर्थिक साक्षर देखील करणार आहे. सक्षम मोबाईल नेटवर्कच्या मदतीने लोकांना व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे.