कौन बनेगा करोडपती हा शो सगळ्याच भारतीयांना माहिती आहे. अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे संचालन करतात. यंदा Kaun Banega Crorepati या शोचा 15 वा सिजन पार पडला. या सिजनचा विजेता ठरला उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणारा जसनील कुमार. जसनीलचा केबीसी पर्यंतचा प्रवास फारच कौतुकास्पद राहिला आहे.
Table of contents [Show]
सामान्य मोटर मेकॅनिकचा मुलगा
जसनील कुमार यांचं बालपण तसं आभावग्रस्त परिस्थिती गेलं. जसनील यांचे वडील, रामसूरत चौहान हे त्यांच्या गावातच मोटर मेकॅनिक म्हणून काम करतात. आपल्या मुलांनी लिहावं, शिकावं, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी आणि स्वाभिमानाने जीवन जगावं असं रामसूरत चौहान यांना वाटत होत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जसनील यांना 12 वी नंतर शिक्षण घेता आलं नाही.
बहिणीचे लग्न, भावंडांचे शिक्षण, शेती आदी गोष्टी सांभाळताना जसनील यांचे वडील कर्जबाजारी झाले. वडिलांच्या डोक्यावर असलेला कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी जसनील यांनी सेल्समन म्हणून एका दुकानात काम सुरु केलं.
Would KBC's Romanchak Mahaul + Jasnil's full excitement + Big B's lucky jacket = Winning it big on the hot seat?
— Sony LIV (@SonyLIV) September 20, 2023
Comment if this equation is right.#KaunBanegaCrorepati streaming on Sony LIV. New Episodes – Mon - Fri, 9 PM#KBC2023 #KBC15 #KBCOnSonyLIV pic.twitter.com/EPaL6KxH75
शिक्षण नाही मात्र अभ्यास सुरू
जसनील यांना पदवीचे शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांनी त्यांचे वाचन सुरूच ठेवले. 2011 साली त्यांनी केबीसीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी फॉर्म भरला. मात्र त्यांना हॉट सीटवर बसण्यासाठी तब्बल 12 वर्षे वाट बघावी लागली. यंदाच्या सिजनमध्ये त्यांची निवड झाली आणि निवड प्रक्रिया पूर्ण करून ते हॉट सीटवर पोहोचले आणि करोडपती देखील बनले.
ज्ञानातून होईल आर्थिक विकास
जसनील यांनी करोडपती बनल्यानंतर माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत शिक्षणावर खूप जोर दिल्याचे जाणवते. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही आर्थिक विकास करू शकता असे जसनील म्हणतात. शिक्षणामुळे तुमची चौकस बुद्धी वाढते आणि चूक-बरोबर समजणे तुम्हांला सोपे जाते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलाबाळांना शिकवले पाहिजे असा संदेश देखील जसनील यांनी दिला आहे. आजच्या युवावर्गाकडे भरपूर प्रतिभा असून त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.
पैशांचे करणार काय?
1 करोड रुपये माझ्यासाठी एक खूप मोठी रक्कम आहे. आमचा परिवार आजवर अभावग्रस्त जीवन जगत आला आहे. या पैशातून मी सर्वात आधी माझे घर बांधणार आहे असा जसनील यांचा विचार आहे. सोबतच मुलाबाळांच्या शिक्षणासाठी देखील हा पैसा वापरणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.
1 करोड रुपये काही जन्मभर पुरणार नाही याची कल्पना जसनील यांना आहे. त्यांनी भविष्यात एक स्टार्ट अप सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्टार्ट अपबाबत नेमके काय करणार आहे हे अजून स्पष्ट नसून त्यावर येणाऱ्या काळात निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.