व्हर्लपूल ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की त्यांचे व्यवस्थापकीय संचालक विशाल भोला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने नरसिम्हन ईश्वरन (Narasimha Eswaran) यांची व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नरसिंहन ईश्वर यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष म्हणून 'की मोबिलिटी सोल्यूशन्स'मध्ये (Key Mobility Solution) काम सांभाळले होते. भोला यांचा राजीनामा व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या (Whirlpool of India) संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्वीकारला आहे
कंपनीने सांगितले की सध्याचे व्यवस्थापकीय संचालक विशाल भोला हे 3 एप्रिल 2023 पर्यंत काम करतील. यानंतर नरसिम्हन ईश्वर यांची नियुक्ती प्रभावी होईल. व्हर्लपूल ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'विशाल भोला यांनी त्याच्या इतर आवडी जोपासण्यासाठी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नरसिम्हन ईश्वर यांची नियुक्ती 4 एप्रिल 2023 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.’
व्हर्लपूल ऑफ इंडिया ही अमेरिकन कंपनी व्हर्लपूल कॉर्पोरेशनची (Whirlpool Corporation) उपकंपनी आहे आणि ती वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी यांसारख्या वस्तूंचे उत्पादन करते.