IRCTC plans to order food through WhatsApp: भारतात सर्वात स्वस्त प्रवास हा ट्रेनचा मानला जातो. देशातील सर्वाधिक नागरिक ट्रेनने प्रवास करतात. प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालय तसेच आयआरसीटीसी हे प्रयत्नरत असतात. आयआरसीटीसीच्या माध्यमातून विशिष्ट स्टेशनवरील हॉटेल उपहारगृहांमधून पदार्थ बूक करून त्याची डिलिव्हरी थेट ट्रेनमध्ये मिळत होती, मात्र प्रत्येकाकडे ते अॅप किंवा त्याची ऑर्डर करण्याची किचकट प्रक्रिया समजत नसल्यामुळे त्याला प्रतिसाद कमी मिळत होता. यामुळे आता आयआरसीटीसीने थेट व्हॉट्सअॅपवर जेवण ऑर्डर कऱण्याची सोय आणली आहे.
प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक संस्मरणीय व्हावा, यासाठी आता प्रवासादरम्यान व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवडीचे पदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. आयआरसीटीसीने विशेष सेवा सुरू केली आहे. या विशेष सेवेच्या मदतीने तुम्ही केवळ खाद्यपदार्थांचीच चौकशी करू शकत नाही आणि तुम्हाला आवडल्यास जेवण बुकही करू शकता.
ही सेवा काय आहे (What is this service?)
रेल्वे प्रवाशांना 8750001323 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून ऑनलाइन केटरिंगची सेवा मिळू शकेल. या सेवेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या चॅट बॉटचा वापर करण्यात आला आहे. जे प्रवाशांच्या सेवेशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देते. प्रवाशांसाठी जेवणाचे बुकिंगही करते. व्हॉट्सअॅपद्वारे केटरिंग सेवा सध्या फक्त विशेष ट्रेनमध्ये दिली जात आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे कंपनी इतर गाड्यांमध्येही ही सेवा सुरू करणार आहे.
जेवण कसे ऑर्डर करावे (How to order food)
आयआरसीटीसीद्वारे (IRCTC) जेवण ऑर्डर करण्यासाठी, प्रवाशाला फक्त त्याचा पीएनआर (PNR) क्रमांक द्यावा लागेल. तुम्हाला कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता आणि फक्त व्हॉट्सअॅप वापरून जेवण ऑर्डर करू शकता.