लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म ‘टिकटॉक’ (TikTok) आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. हे अॅप चीनमधील 'ByteDance' या कंपनीचे आहे. सध्या जगभरातील देश TikTok च्या वापरावर बंदी घालताना दिसत आहेत. भारताने देखील TikTok च्या वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी घालण्यामागे वैयक्तिक माहितीची असुरक्षितता हे कारण प्रामुख्याने ऐकायला मिळत आहे. असे असले तरीही टिकटॉकची मूळ कंपनी 'ByteDance' च्या 2022 च्या उत्पन्नात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे ब्लूमबर्गच्या अहवालातून समोर आले आहे.
ब्लूमबर्गचा अहवाल काय सांगतोय?
2012 मध्ये ByteDance या कंपनीची स्थापना झाली. सध्या या कंपनीचे TikTok आणि डॉयीन (Douyin) हे दोन व्हिडीओ प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. नुकताच ByteDance या कंपनीच्या उत्पन्नासंदर्भात ब्लूमबर्गने (Bloomberg Report) एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातील माहितीनुसार कंपनीच्या 2022 च्या वार्षिक उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022 मध्ये कंपनीने 80 अरब डॉलर्सपर्यंत वार्षिक उत्पन्न पोहचले आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये हे प्रमाण 20 अरब डॉलर्सने वाढले आहे.
टेनसेंट कंपनीच्या उत्पन्नाशी बरोबरी
ByteDance कंपनीची झालेली महसूल वाढ ही सोशल मीडियावरील फेसबुक (Facebook) आणि अॅमेझॉन (Amazon) या कंपन्यांपेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे वी चॅट (We Chat App) या अॅपची मूळ कंपनी टेनसेंटचे (Tencent Company) 2021 चे वार्षिक उत्पन्न 554.6 अरब युआन म्हणजेच 80 अरब डॉलर इतके आहे. ByteDance कंपनीने 2022 मध्ये कमावलेले वार्षिक उत्पन्न पाहता ते आता वी चॅटशी (We Chat) बरोबरी करू लागले आहे.
‘या’ माध्यमातून मिळतंय उत्पन्न
अमेरिका आणि इतर बऱ्याच देशांमध्ये TikTok वर बंदी घालण्यात आली आहे. बऱ्याशाच सरकारी संस्थांनी TikTok ला फोनमधून हटवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना देखील ByteDance कंपनीने उत्पन्न वाढवण्यात यश मिळवले आहे.
सध्या अमेरिकेत TikTok चे 15 कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या उत्पन्न वाढीमध्ये जाहिरातींचा (Advertisement) मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ByteDance चे दोन्ही व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok आणि डॉयीन (Douyin) जाहिरातीतून पैसे कमवत आहेत. हे दोन्ही प्लॅटफॉर्म जलदगतीने लोकांपर्यंत पोहचत असल्याने जाहिरात देणाऱ्या कंपन्या (जाहिरातदार) देखील या माध्यमांकडे खेचल्या जात आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीचा सर्वात मोठा मार्ग हा जाहिरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
Source: https://bit.ly/40YeTWo