Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

America banning TikTok : अमेरिका टिकटॉकवर बंदी का आणतंय? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

America banning TikTok

बाईटडान्स (ByteDance) मालकीच्या टिकटॉक (TikTok) ने अलीकडेच त्याच्या स्त्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी यूएसमधील पत्रकारांची हेरगिरी केल्याचे कबूल केले. रिपोर्टनुसार, अमेरिका आता टिकटॉकच्या वापरावर बंदी (America banning TikTok) घालण्याचा प्रयत्न करत आहे.

बाईटडान्स (ByteDance) मालकीच्या टिकटॉक (TikTok) ने अलीकडेच त्याच्या स्त्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी यूएसमधील पत्रकारांची हेरगिरी केल्याचे कबूल केले. रिपोर्टनुसार, अमेरिका आता टिकटॉकच्या वापरावर बंदी (America banning TikTok) घालण्याचा प्रयत्न करत आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की अमेरिकेच्या रिप्रेझेंटेटिव्ह हाऊसने गेल्या आठवड्यात एका कायद्याला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे सरकारी मालकीच्या उपकरणांमध्ये अॅपवर बंदी घालण्यात येईल. दरम्यान टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक, शेअरचॅट या सारख्या सोशल मीडियाच्या अतिवापराने तेथील अमेरिकेतील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडत असल्याने सोशल मीडियाच्या विविध पर्यायांवर सरसकट बंदीची मागणी करणारी याचिका अमेरिकेत एका मोठ्या शाळेने कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला, बाईटडान्स (ByteDance) ने एक अंतर्गत तपासणी केली ज्यामध्ये त्यांच्या चीनमधील चार कर्मचार्‍यांनी त्यांच्या कव्हरेजचे स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात बझफीड (BuzzFeed), फायनान्शिअल टाईम्स (Financial Times) आणि फोर्ब्स (Forbes) यांच्या पत्रकारांसह इतर पत्रकारांविषयी माहिती गोळा करण्यासाठी टिकटॉक या अँपचा वापर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी पत्रकारांचे आयपी अॅड्रेस बघितले आणि त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवल्याचे समोर आले आहे.

त्या चार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

बाइटडान्सने या घटनेत सहभागी असलेल्या चार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने दावा केला आहे की, अमेरिकन यूजर्सचा डेटा चीनमध्ये साठवला जात नाही. परंतु पाळत ठेवणार्‍या टीमच्या अॅक्टीव्हिटीजचे खुलासे चीन आणि अमेरिकेत पसरले आहेत ज्यामुळे चीनच्या दाव्यावर शंका निर्माण झाली आहे. सरकारी मालकीच्या उपकरणांवर टिकटॉकच्या वापरावर बंदी घालणारे विधेयक डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सिनेटने सादर केले होते. निक्की एशियाच्या रिपोर्टनुसार, लवकरच या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची स्वाक्षरी होणार आहे.

अनेक राज्यांनी टिक टॉकवर बंदी घातली 

स्टेट डिपार्टमेंट, डिफेन्स डिपार्टमेंट आणि होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने आधीच टिकटॉकवर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे, अलाबामा आणि उटा सारख्या राज्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सरकारी मालकीच्या डिव्हाइसेस आणि आयटी नेटवर्कवर टिकटॉकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कारवाई केली. फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या सदस्यानुसार 13 डिसेंबरपर्यंत किमान 12 राज्यांनी असे निर्बंध स्वीकारले आहेत.

भारताने घातली बंदी

टिकटॉक वापरकर्त्यांना म्युझिकवर सेट केलेल्या व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्याची परवानगी देतो. 2021 पर्यंत, 90 दशलक्षाहून अधिक अमेरिकन त्याचा वापर करत आहेत. यामध्ये या अॅपचे दोन तृतीयांश युजर्स तरुण आहेत. भारतात या अॅपवर आधीच बंदी आहे. भारत सरकारने 29 जून 2020 रोजी चीनी शॉर्ट व्हिडिओ अॅपवर बंदी घातली होती.