Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Important Things to Remember before Investment: गुंतवणूक करताना 'या' बाबींचा गांभीर्याने विचार करा

Investment

आपण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्ये काहींना यश येते तर काहींना तोटा होता. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, जमीन इ. विविध मार्गांनी अनेकजण गुंतवणूक करतात. प्रत्येकाची कमाई आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी अधिक असते त्यानुसार आपण योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करावी.

आपण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्ये काहींना यश येते तर काहींना तोटा होता. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, जमीन इ. विविध मार्गांनी अनेकजण गुंतवणूक करतात. प्रत्येकाची कमाई आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी अधिक असते त्यानुसार आपण योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करावी. कशामध्ये गुंतवणूक करावी यापेक्षा कशामध्ये गुंवतणूक करु नये, हे देखील महत्त्वाचे आहे. याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची चुकीची वेळ कोणती?

रिअल इस्टेट मध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करत असता तेव्हा काही बाबी ध्यानात घ्यायला हव्या. जसे की तुम्ही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि इमारत पूर्ण बांधून झाल्यावर फ्लॅट खरेदी करण्यास जात असाल तर तुम्हाला ती मालमत्ता महाग मिळेल. यापेक्षा तुम्ही इमारतीचे बांधकाम प्राथमिक टप्प्यात असतानाच फ्लॅट खरेदी करावा. कारण, यावेळी बिल्डरला किंवा विकासकाला सर्वात जास्त पैशाची गरज असते. तेव्हाच जर तुम्ही फ्लॅट बूक केला तर तो तुम्हाला योग्य भावात मिळेल.

कार खरेदी करताना काय लक्षात घ्यावे

कार खरेदीसाठी अनेक जण इच्छुक असतात. अनेक ब्रँड्स भारतात कार विक्री करतात. मात्र, कार घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे कारची लांबी किती आहे. जर तुम्ही 4 मीटर पेक्षा मोठी कार घेत असाल तर त्यावर तुम्हाला 50 टक्के कर भरावा लागेल. पण जर कार 4 मीटर पेक्षा लहान असेल आणि पेट्रोल इंजिन 1200 cc आणि डिझेल इंजिन 1490 पेक्षा कमी क्षमतेचे असेल तर अशा कारवर तुम्हाला फक्त 29 टक्के कर भरावा लागेल. त्यामुळे तुमची गरज पाहून तुम्ही 4 मीटर पेक्षा लहान कार खरेदी करत असाल तर तब्बल 21 टक्के कर तुम्ही वाचवू शकता. चार मीटरपेक्षा लहान कार सेगमेंटमध्ये बलेनो, सोनेट, आय 20, ब्रेझा, नेक्सॉन या सारख्या चांगल्या गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Endowment आणि ULIP योजना

जीवन विमा पॉलिसी खरेदी करायची असेल तर ती वेगळी पॉलिसी खरेदी करा. मॅनी बॅकच्या हव्यासापोटी Endowment आणि ULIP योजनेत गुंतवणूक शक्यतो टाळा. यामध्ये तुम्हाला जास्त प्रीमियमही भरावा लागेल आणि जीवन विमा घेण्याचा तसेच गुंतवणूकीचा दोन्हीही उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे प्युअर लाईफ इन्शुरन्स घ्यावा. मनी बॅकच्या नावाखाली तुम्हाला खूप प्रीमियम द्यावा लागेल. तसे न करता ते पैसे तुम्ही तुम्ही कोणत्याही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता.

सेक्टर म्युच्युअल फंड

सेक्टर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे शक्यतो टाळावे. कारण यामध्ये आपण फंड मॅनेजरला सांगू शकतो की, कोणत्या क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. मात्र, या फंडमध्ये गुंतवणूकदाराला शुल्क जास्त आकारले जाते. तसेच फंड मॅनेजरची जबाबदारीही कमी होते. त्यापेक्षा सेक्टर म्युच्युअल फंडमध्ये न करता दुसऱ्या चांगल्या फंडामध्ये गुंतवणूक करावी.

पेनी स्टॉक्स

पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करुन चांगली कमाई होईलच असे नाही. अनेक वेळा गुंतवणूकदारांचा कल पेनी स्टॉक खरेदी करण्याकडे असतो. मात्र, यामुळे तुम्ही अडचणी येण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा 1 किंवा 2 रुपयांना शेअर्स मिळणारी कंपनी भविष्यात पुढे जाईल याची शाश्वती नसते. त्यापेक्षा सुस्थितीत असलेल्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले तर भविष्यात त्यातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे.

फ्युचर आणि ऑप्शन्स 

फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करणे टाळावे. अल्प काळासाठी ही गुंतवणूक जरी फायद्यात ठरली तर दीर्घ काळामध्ये यामध्ये तोटा होण्याची जास्त शक्यता आहे. फ्युचर आणि ऑप्शन्स हे हेज इन्स्ट्रुमेंट असून मोठ्या संस्था चलन अस्थिरतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याचा वापर करतात. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी फ्युचर आणि ऑप्शन्सला न्युक्लिअर बॉम्बशी तुलना केली.

क्रिप्टोमधील अस्थिरता

गुंतवणूकीसाठी क्रिप्टो हा एक अस्थिर मार्ग आहे. कोणते चलन बाजारात चालेल आणि कोणते चालणार नाही याबाबत नक्की अंदाज बांधता येत नाही. जेव्हा आपण HDFC सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा पुढील दोन वर्षात HDFC बाजारातून नाहीशी होण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र, क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास एखादे चलन दोन वर्षात बाजातून दिसेनासे होऊ शकते. त्यामुध्ये तुमचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)