Fixed Deposit Rate: जर तुम्ही बँकेच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, देशातील टॉप बँकांच्या एफडी दरांबद्दल माहिती यात देत आहोत. वर्ष 2022 मध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. तेव्हापासून अनेक बँकांनी त्यांच्या एफडीचे दर सातत्याने वाढवले आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Table of contents [Show]
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.00 टक्के ते 7.00 टक्के व्याजदर देत आहे.
ICICI बँक (ICICI Bank)
ICICI बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.00 टक्के ते 6.90 टक्के व्याजदर देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2 कोटींपेक्षा कमी FD वर 3.00% ते 6.90% पर्यंत व्याजदर देत आहे.
Axis Bank
अॅक्सिस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना रु. 2 कोटींपेक्षा कमी FD वर 3.50 ते 7.00 टक्के व्याजदर देत आहे. हे व्याज 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या FD वर दिले जात आहे.
बँक ऑफ इंडिया (Bank of India)
बँक ऑफ इंडिया त्यांच्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.00% ते 6.00% पर्यंत व्याजदर देत आहे. बँक सामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर हे दर देत आहे.