बरेच गुंतवणूकदार नवीन वर्ष सुरू झाले की, नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार करतात. किंवा सुरू असलेल्या गुंतवणुकीमध्ये नवीन योजनांचा समावेश करतात. तुम्ही सुद्धा 2023च्या पार्श्वभूमीवर असाच विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी लार्ज कॅप म्युच्युअल फंड (Mutual Fund)मधील काही महत्त्वाच्या कंपन्यांची माहिती घेऊन आलो आहोत.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदार म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, लार्ज कॅप म्युच्युअल फंड यांना मार्केटमधील टॉप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य असते. म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये जमा होणारा निधी, संबंधित फंड मॅनेजरला भांडवलाच्या आकारामानानुसार मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक असते. मार्केट जेव्हा अस्थिर (Volatile) असते; तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सवर तितकासा फरक पडत नाही. या कंपन्या भांडवलाच्या दृष्टीने आणि एकूणच मार्केटमध्ये त्यांचा दबदबा असतो. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या अस्थिरतेचा परिणाम लार्ज कॅप कंपन्यांवर तितकासा होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मार्केटमधील अस्थिरता आणि अनियमितता या परिस्थितीची माहिती असते. त्यामुळे ते जाणीवपूर्वक लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. लार्ज कॅप किंवा इक्विटी मार्केटमधील कोणताही म्युच्युअल फंड हा मार्केटमधील अस्थितरतेपासून अलिप्त राहू शकत नाही. पण तुलनेने इतर कॅपपेक्षा लार्ज कॅप योजनांमध्ये गुंतवणूक करणे चांगले असे मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे असते.
आपण अशा काही लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या 2023 मध्ये चांगला परतावा देऊ शकतात. पण त्यापूर्वी लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. लार्ज कॅप म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन आणि चांगला परतावा मिळवून देणारी स्कीम मानली जाते. या स्कीममधील गुंतवणूक ही इतर इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा कमी जोखमीची मानली जाते. तसेच मार्केटमधील अस्थिरतेचा यावर तितकासा परिणाम दिसून येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, लार्ज कॅपमधील स्कीममध्ये जोखीम नसते किंवा मार्केटमधील व्हॉलॅटॅलिटीचा त्यावर परिणाम होत नाही.
2023 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड
- अॅक्सिस ब्ल्यूचिप फंड (Axis Bluechip Fund)
- कॅनरा रोबेको ब्ल्यूचिप इक्विटी फंड (Canara Robeco Bluechip Equity Fund)
- मिराई अॅसेट लार्ज कॅप फंड (Mirae Asset large Cap Fund)
- बीएनपी परिबास लार्ज कॅप फंड (BNP Paribas Large Cap Fund)
- एड्लविस लार्ज कॅप फंड (Edelweiss Large Cap Fund)
No. | Fund Name | NAV | Expense Ratio | AUM | 3Y Return (Annualised) | 5Y Return (Absolute) |
---|---|---|---|---|---|---|
1. | Axis Bluechip Fund | Rs. 44.97 | 1.63 % | Rs.36,871 Cr | 12.42% | 85.83% |
2. | Canara Robeco Bluechip Equity Fund | Rs. 43.19 | 1.86 % | Rs. 8547 Cr | 17.11 % | 98.21% |
3. | Mirae Asset large Cap Fund | Rs. 82.937 | 1.58 % | Rs. 34,406 Cr | 15.57 % | 79.28 % |
4. | BNP Paribas Large Cap Fund | Rs. 15.1129 | 2.14 % | Rs. 1397 Cr | 15.86 % | 81.21% |
5. | Edelweiss Large Cap Fund | Rs. 58.12 | 2.56 % | Rs. 375 Cr | 16.02 % | 82.25% |
Source: www.moneycontrol.com/ |