Mid Cap Mutual Funds: मागील एक वर्षाच्या कालावधीत काही मिड कॅप म्युच्युअल फंडांनी 19% ते 29% पर्यंत परतावा दिला आहे. या लेखात पाहूया 2 जून 2023 पर्यंत सर्वाधिक परतावा देणाऱ्या 8 मिड कॅप म्युच्युअल फंड स्किम कोणत्या आहेत. Association of Mutual Funds in India (AMFI) चा संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली आहे.
डायरेक्ट प्लॅन अंतर्गत 8 फंडांनी 19 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने सर्वाधिक 28.91% परतावा दिला. त्यानंतर एचडीएफसी मिड कॅप फंडाने कामगिरी केली. ज्या फंडांनी मागील एक वर्षात चांगली कामगिरी केली आहे ते फंड भविष्यातही चांगला परतावा देतील याची खात्री नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना अधिकृत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड (Motilal Oswal Midcap Fund)
मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंडने डायरेक्ट प्लॅन अंतर्गत मागील एका वर्षात 28.91% टक्के परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनअतंर्गत 27.43% परतावा दिला. हा फंड NIFTY Midcap 150 इंडेक्सवर आधारित आहे.
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंड (HDFC Mid-Cap Opportunities Fund)
या फंडाने डायरेक्ट प्लॅन अंतर्गत 26.99% टक्के परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅननुसार 26.19% टक्के परतावा दिला. ही योजना NIFTY Midcap 150 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth Fund)
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडने डायरेक्ट प्लॅननुसार मागील एका वर्षात 20.44% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅन अंतर्गत 19.46% परतावा दिला. ही फंड NIFTY Midcap 150 इंडेक्स वर आधारित आहे.
फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंड (Franklin India Prima Fund)
फ्रँकलिन इंडिया प्रायमा फंडच्या डायरेक्ट प्लॅनने मागील एका वर्षात 20.76% परतावा दिला. तर रेग्युरलर प्लॅननुसार 19.76% परतावा दिला. ही योजना NIFTY Midcap 150 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
एडलवाइस मिड कॅप फंड (Edelweiss Mid Cap Fund)
एडलवाइस मिड कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनने मागील एक वर्षात 20.56% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनने 18.71% टक्के परतावा दिला. हा फंड NIFTY Midcap 150 इंडेक्सवर आधारित आहे.
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड (SBI Magnum Midcap Fund)
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंडने डायरेक्ट प्लॅननुसार 19.75% परतावा दिला. तरर रेग्युलर प्लॅनमधून 18.71% परतावा मिळाला. ही फंड NIFTY Midcap 150 इंडेक्सवर आधारित आहे.
सुंदरम मिड कॅप फंड (Sundaram Mid Cap Fund)
सुंदरम मिड कॅप फंडने डायरेक्ट प्लॅननुसार 19.56% परतावा दिला. तर रेग्युलर प्लॅनमधून 18.50% परतावा दिला. हा फंड NIFTY Midcap 150 इंडेक्सवर आधारित आहे.
इनव्हेस्को इंडिया मिड कॅप फंड (Invesco India Mid Cap Fund)
इनव्हेस्को इंडिया मिड कॅप फंडच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील एक वर्षात 19.42% परतावा मिळाला. तर रेग्युलर प्लॅननुसार 17.82% परतावा मिळाला. हा फंड S&P BSE 150 MidCap टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.
( डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही. )