Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी CA ची गरज कधी लागू शकते?

ITR file

Image Source : www.outlookindia.com

इन्कम टॅक्स रिटर्न स्वत: भरावा की सीएची मदत घ्यावी यामध्ये अनेकांचा संभ्रम होतो. तुम्ही ऑनलाइन कुणाच्याही मदतीशिवाय रिटर्न फाइल करू शकता. मात्र, जर तुमचे उत्पन्न, कर वजावट, गुंतवणूक परतावा क्लिष्ट असेल तर तुम्हाला सीएची मदत लागू शकते.

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. अद्यापही रिटर्न फाइल केला नसेल तर जागे व्हा. करपात्र उत्पन्न असतानाही रिटर्न फाइल केला नाही तर दंड होऊ शकतो. मात्र, अद्यापही अनेकांना स्वत: ITR भरू की चार्टड अकाउंटंटची मदत घेऊ यामध्ये संभ्रम होतो. पाहूया कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही स्वत: रिटर्न भरायला हवा आणि केव्हा सीएची गरज पडू शकते. 

उत्पन्नाचे साधन

जेव्हा तमच्या उत्पन्नाचा स्रोत एकच असेल तेव्हा आयटीआर फाइल करण्यास सोपे जाते. इतर काहीही गुंतवणूक नसेल, उत्पन्न करपात्र नसल्यास तुम्ही नीट माहिती घेऊन ऑनलाइन ITR भरू शकता. अशा वेळी फक्त फॉर्म 16 मधील माहिती किंवा उत्पन्नाची माहिती ऑनलाइन भरावी लागेल.

नोकरी बदलली असल्यास काय करावे?

जर तुम्ही एका आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली असेल तर तुम्हाला सीएची गरज पडू शकते. (Help of CA to file ITR) कारण, तुमच्या उत्पन्नाचा टॅक्स स्लॅब बदलू शकतो. नवीन कंपनीने जर तुमचा आधीचा कर आणि पेमेंट पगार करताना विचारात घेतला नसेल तर हे काम कठीण होऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही आयटीआर भराल तेव्हा सरकारच्या माहितीशी तुम्ही दिलेली माहिती जुळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सीएची मदत घेतलेले योग्य राहील. 

गुंतवणूक, मालमत्ता खरेदी-विक्री करत असल्यास 

तुम्ही जर शेअर मार्केट म्युच्युअल फंड, बाँड्स, स्थावर मालमत्ता इ. आर्थिक वर्षात खरेदी विक्री केली असेल तर यातील नफ्यावर कर लागू होतो. त्यामुळे आयटीआर फाइल करणे अवघड होऊ शकते. जर तुम्ही अशाही परिस्थितीत स्वत: रिटर्न फाइल करण्याचा निर्णय घेतल्यास चुकीची माहिती अपलोड होऊ शकते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यापेक्षा असे किचकट रिटर्न फाइल करण्यासाठी सीएची मदत घ्या. 

स्थावर मालमत्ता विक्री

स्थावर मालमत्ता खरेदी केल्यानंतर 5 वर्षांच्या आत विक्री करत असाल तरी रिटर्न भरणे कठीण होऊ शकते. जर तुम्ही 80C नुसार कर वजावटीचा फायदा घेतला असेल तर ज्या वर्षी तुम्ही मालमत्ता विक्री केली त्यावर्षी आधी मिळालेला कर फायदा उत्पन्नात जमा केला जाईल. अशी आकडेवारी आणि माहिती सर्वसामान्य नागरिकांना हाताळता येत नाही, त्यामुळे सीएची मदत घेतली तर योग्य ठरेल.   

व्यवसायातून उत्पन्न असेल तर काय करावे?

जर तुम्ही व्यावसायिक किंवा सेल्फ एम्पलॉइड असाल तर तुम्हाला स्वत: रिटर्न फाइल करणे अवघड होऊ शकते. छोटा व्यवसायिकांनाही सीएची गरज पडू शकते. व्यवसायाचा टर्नओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर सीएची गरज हमखास लागेल.

दरम्यान, तुम्हाला टॅक्स आउटस्टँडींगची नोटीस किंवा इतर कोणतीही नोटीस आयकर विभागाकडून आली असेल. छोट्या व्यवसायातील उत्पन्न अचानक वाढल्याने पहिल्यांदाच कर भरण्याची वेळ येत असेल तरीही सीएची मदत फायद्याची ठरेल. याशिवाय तुम्ही जर दुसर्‍या कामात व्यग्र असाल तर हे काम एक्स्पर्टकडे सोपवून निश्चिंत राहू शकता. स्वत: रिटर्न भरून चूक होण्याची भीती असेल तर दुसऱ्या पर्यायाकडे वळा.