शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्यास मदत व्हावी म्हणून सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM KISAN YOJANA). या योजनेचे आता पर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. आता शेतकरी वाट बघत आहे; 13 वा हप्ता कधी येणार. पण त्याआधी हे माहित करून घ्या की, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (e-KYC) झाले नाही. त्यांनी तात्काळ त्यांचे केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी नसल्यास तेराव्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार नाही.
कधी मिळणार 13 वा हप्ता?
पीएम किसान योजनेचे दर वर्षी 3 हप्ते मिळतात, त्यात 4 महिन्याचा फरक असतो. मागील महिन्यात 17 ऑक्टोबरला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आणि आता 13 वा हप्ता पुढे चार महिन्याने शेतकऱ्यांना मिळेल. म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
केवायसी करणे अनिवार्य आहे का?
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 12व्या हप्त्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतले आहे; त्यांच्याच बॅंक खात्यात पुन्हा पैसे जमा होतील. जर तुम्ही आत्तापर्यंत (Know Your Customer - KYC) केले नसेल तर तुमच्या खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत. ई-केवायसी शिवाय तुमचा 13 वा हप्ता अडकेल. केवायसीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही केवायसी करू शकता. यासोबतच, जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेसाठी पहिल्यांदा अर्ज करत असाल तर कागदपत्र आणि अर्ज योग्यरित्या भरणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमची स्थिती देखील माहित असणे आवश्यक आहे, कारण कधीकधी काही त्रुटींमुळे, हप्त्याचे पैसे बंद होतात. या सर्व गोष्टी तपासून तुम्ही पीएम किसान योजनेच्या 13व्या आणि आगामी हप्त्यांचा लाभ घेऊ शकता.
ई-केवायसी कसे करायचे!
शेतकरी पीएम किसानसाठी ई-केवायसी दोन प्रकारे पूर्ण करू शकतात. ई-केवायसी प्रक्रिया घरी बसून पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय, शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन त्यांचे ई-केवायसी देखील करू शकतात.
जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी करत असेल तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, तर जर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी केले तर त्याला खर्च करावा लागेल.
कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्याचे बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी केले जाईल. म्हणजे शेतकऱ्याच्या बोटाचे ठसे घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होते. यासोबतच लाभार्थी शेतकऱ्याचे आधारकार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचीही गरज कॉमन सर्व्हिस सेंटरवर असेल.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर ई-केवायसीसाठी 17 रुपये (पीएम किसान ई-केवायसी फी) आकारले जातात. याव्यतिरिक्त, सीएससी ऑपरेटर 10 ते 20 रुपयांपर्यंत सेवा शुल्क देखील आकारतात. अशा प्रकारे, तुम्हाला CSC कडून e-KYC साठी 37 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील.