Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM KISAN YOJNA – ऑनलाईन नोंदणी कशी करायची? वर्षाला 6 हजार रूपये कसे मिळवायचे?

PM KISAN YOJNA – ऑनलाईन नोंदणी कशी करायची? वर्षाला 6 हजार रूपये कसे मिळवायचे?

Image Source : www.en.krishakjagat.org

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे (PM KISAN YOJNA) सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशी संबंधित गोष्टी.

PM KISAN YOJNA प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पण आता ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 1 डिसेंबर, 2018 पासून राबविण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. लहान शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. असंख्य संकटांचा सामना करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर गोष्टींसाठी या रोख रकमेची मदत होत आहे. 

PM KISAN योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?

योजना सुरू केली तेव्हा सरकारने फक्त 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. पण आता या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले आहे. असे असलं तरी घटनात्मक पदावरील व्यक्ती जसे की, राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इत्यादी, आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

शेतकरी 3 पद्धतीने करू शकता PM KISAN योजनेसाठी नोंदणी

1. शेतकरी या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गावातील तलाठी कार्यालयात कागदपत्रे जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
2. शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (Common Service Centre) मध्ये ही नोंदणी करू शकतात. पण या केंद्रात नोंदणी करण्यासाठी शुल्क आकारले जाते.
3. शेतकरी PM-Kisan वेबपोर्टलवर (https://www.pmkisan.gov.in/) जाऊन स्वत: नोंदणी करू शकतात.

PM KISAN वेबपोर्टलवर अशी करा ऑनलाईन नोंदणी

सर्वप्रथम PM-Kisan वेबपोर्टलवर (https://www.pmkisan.gov.in/) जा. वेबपोर्टलवर उजवीकडे फार्मर कॉर्नर (Farmers Corner) दिसेल. त्यातील पहिला पर्याय New Farmer Registration यावर क्लिक करा.

pm-kisan-website.jpg

New Farmer Registration form नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यात तुम्हाला आधार क्रमांक (Aadhar Card Number) आणि कॅप्चा (captcha) मधील आकडे आणि अक्षरं जशी आहेत तशी टाकायची आहेत.

त्यानंतर कंटिन्यू (Continue) या पर्यायावर क्लिक केले की, Record not found with given details असा मॅसेज येईल. म्हणजेच तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी नोंदणी झालेली नाही. आता तुम्हाला त्या मॅसेजखाली असलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal? असा मॅसेज येईल. या मॅसेजच्या खाली असलेल्या Yes या पर्यायावर क्लिक करा.

आता योजनेच्या नोंदणीसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. यात सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे. पत्ता, शेतकऱ्याचे नाव (आधार कार्डवर आहे तसेच लिहावे), लिंग, जातीचा प्रवर्ग तसेच तुमच्याकडे किती जमीन आहे त्यानुसार तुमचा प्रकार निवडा. या माहितीच्या आधारे तुमचा आयडेंटी प्रूफ क्रमांक (Identity proof number) आपोआप तयार होतो.

आता बँक खात्याची संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरल्यानंतर Submit for Aadhar authentication या पर्यायावर क्लिक करायचे. क्लिक केले, की Yes, Aadhar Authenticated Successfully असा मॅसेज येईल. म्हणजे तुमचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झाले.

त्यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती, पुढे शेतजमिनीविषयीची माहिती जसे की, सर्व्हे क्रमांक किंवा सातबाराच्या उताऱ्यातील 8-अ मधील खाते क्रमांक अशी माहिती भरायची आहे.

ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, (I certify that all the given details are correct) या पर्यायासमोर टीकमार्क करायचे. शेवटी भरलेला फॉर्म वाचून सेव्ह (Save) या बटणावर क्लिक करायचे. 

क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक मॅसेज येईल. त्यात तुमचा identity proof number दिला जातो आणि तुमची नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे, असे कळवले जाते.

नोंदणी केलेला अर्ज अधिकाऱ्यांकडून तपासला जातो. तो योग्य असेल तर पुढील कार्यवाही जातो आणि नसेल तर तुमचा अर्ज नाकारला जातो. अर्जाची स्थिती तुम्ही वरीलप्रमाणे फार्मर कॉर्नरमध्ये status of self registered or csc farmer इथे पाहू शकता. यात आधार क्रमांक आणि captcha टाकून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

पैसे जमा झाले की नाही असे तपासा?

PM-Kisan योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे तुम्हाला मोबाईलवर आलेल्या मॅसेजवरून ही कळू शकते. त्याचबरोबर तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता.
वेबसाईटवरील Farmer Corner मध्ये beneficiary status या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून तुम्ही पैसे मिळाळ्याची सविस्तर माहिती पाहू शकता.