Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Plan: निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी कोणत्या वयात गुंतवणुकीला सुरुवात करावी? वाचा

Investment

Image Source : https://www.freepik.com/

कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.

आर्थिक स्वातंत्र्य व सुरक्षा हवी असल्यास कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे आहे. कमी वयात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे मिळतात. विशेष म्हणजे या गुंतवणुकीमुळे निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगायला मदत होते. 

अनेकांना वाटते की गुंतवणूक ही नेहमी मोठीच असायला हवी. मात्र, वयाची 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेली कमीत कमी गुंतवणूक भविष्यात तुम्हाला दुप्पट परतावा मिळून देऊ शकते. या लेखातून निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज आहे व कोणत्या वयात गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज?

निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी किती पैसे असायला हवे, हे प्रत्येक व्यक्तीच्या खर्चानुसार ठरते. यासाठी सर्वसाधारणपणे 30X नियम वापरला जातो. म्हणजे तुमच्या एका वर्षाच्या खर्चाला 30 ने गुणले असता येणारी रक्कम निवृत्तीच्यावेळी असायला हवी. 

समजा, तुमचा एका वर्षाचा खर्च 5 लाख रुपये आहे. तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्ती घेतली. यापुढील 30 वर्ष आरामात जगण्यासाठी तुमच्याकडे 1.5 कोटी रुपये असणे गरजेचे आहे. मात्र, हा आकडा प्रत्येक व्यक्तीच्या गरजा व खर्चानुसार ठरतो.

गुंतवणुकीला कधी सुरुवात करावी?

अनेकांना गुंतवणुकीला कधी सुरुवात करावी? असा प्रश्न पडतो. याचे सर्वात सोपे उत्तर आहे नोकरीला लागल्यावर त्वरित गुंतवणुकीला सुरुवात करावी. वयाच्या 25-30 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास भविष्यात फायद्याचे ठरते.

समजा, तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी दरमहिना 5 हजार रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. पुढील 25 वर्ष नियमित गुंतवणुकीसह 8 टक्के परतावा मिळाल्यास वयाच्या 50व्या वर्षी तुमच्याकडे जवळपास 47 लाख रुपये असतील. मात्र, वयाच्या 30व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास 50व्या वर्षी तुम्हाला 30 लाख रुपये मिळतील. त्यामुळे कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे आहे.

कमी वयात गुंतवणूक करण्याचे फायदे

चक्रवाढीचा फायदा कमीत वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ दराने मिळणारा परतावा. तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल, तेवढा अधिक चक्रवाढीचा फायदा मिळेल. चक्रवाढीमुळे तुमच्या मूळ गुंतवणुकीसह मिळणाऱ्या व्याजादार देखील व्याज मिळते व यामुळे गुंतवणूक केलेल्या रक्कमेत मोठी वाढ होते.
दीर्घकालीन उद्दिष्ट कमीत वयात गुंतवणुकीला सुरुवात केल्यास दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते. घर, गाडी खरेदी करणे, व्यवसाय सुरू करण्यापासून ते निवृत्तीपर्यंतच्या सर्व गोष्टी यामुळे शक्य होतात.
निवृत्तीनंतर फायदानिवृत्तीनंतर उत्पन्न बंद होते. अशावेळी हीच गुंतवणूक उपयोगी येत असते. त्यामुळे कमी वयात केलेल्या गुंतवणुकीत निवृत्ती घेईपर्यंत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते.
आर्थिक स्वातंत्र्य स्टॉक्स, सोने, रिअल इस्टेटसह वेगवेगळ्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होते. आपत्कालीन स्थितीमध्ये पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. याशिवाय, गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिरताही प्राप्त होते.