जर तुम्ही जुने घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर हा लेख जरूर वाचा. प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी त्या प्रॉपर्टीचे वय काय, स्थिती काय हे बघणे फार महत्वाचे असते. याचे मुख्य कारण म्हणजे कुठल्याही प्रॉपर्टीची किंमत ही त्या प्रॉपर्टीच्या वयानुसार ठरत असते. जितके जास्त प्रॉपर्टीचे वय तितके जास्त बाजारमूल्य कमी, हा रिअल इस्टेट मार्केटचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही जर जुनी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर तुमचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टींची खातरजमा करून घ्या.
अनेकांना असा समज असतो की जुनी प्रॉपर्टी खरेदी केली तर आपल्याला रेडी पजेशन मिळेल आणि नव्या वास्तूत जाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. हा मुद्दा खरा असला तरी त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अनेकदा मोक्याच्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी मिळत असताना खरेदीदार त्या वास्तूच्या वयाकडे कानाडोळा करतात. तुमच्या पसंतीच्या ठिकाणी मालमत्तेचा तात्काळ ताबा मिळू शकतो म्हणून घाई करतात.
रिअल इस्टेट तज्ञ सांगतात की अनेक प्रसंगी जुने घर घेणे फायदेशीर ठरते. मात्र, जुने घर घेताना अनेक बाबी तपासून घ्याव्यात, अशा सूचना सर्व तज्ज्ञांनी देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे वय. म्हणजे ती इमारत किती जुनी आहे.
प्रॉपर्टीचे वय किती असावे?
मालमत्तेचे वय म्हणजे ते घर बांधून किती वर्षे झाली आहेत. यावरून आणखी किती वर्षे ही प्रॉपर्टी तग धरू शकते याचा अंदाज लावता येतो. 50 वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रॉपर्टी खरेदी करणे टाळले पाहिजे असे जाणकार सांगतात. कारण प्रॉपर्टी जितकी जुनी होत जाते, तितके तिचे आयुष्य घटते आणि बांधकामाच्या संरचनात्मक समस्या वाढू लागतात. त्यामुळे प्रॉपर्टीच्या देखभालीवर अधिक खर्च करावा लागतो. अनेक प्रकरणात तर इमारतीचे नूतनीकरण करण्याची देखील वेळ येते.संपूर्ण इमारतीचे नुतनीकरण करणे ही मोठी खर्चिक बाब असते.
साधारणपणे, कॉंक्रिट स्ट्रक्चरचे सरासरी वय 75 ते 100 वर्षे मानले जाते. अपार्टमेंटचे आयुष्य 50-60 वर्षे मानले जाते तर जमिनीवर बांधलेल्या घराचे (रो हाऊस) आयुष्य यापेक्षा जास्त मानले जाते. त्यामुळे जुने घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्या.
तसेच व्यवहार करण्यापूर्वी प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्रे जरूर वाचून घ्या. ज्यातून तुम्हाला आतापर्यंत या प्रॉपर्टीचे झालेले व्यवहार कळतील आणि खरेदीबाबत निर्णय घेणे सोपे जाईल.