Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foreign Real Estate Investment: परदेशात मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Foreign Real Estate Investment

Property Investment in Foreign: परदेशात गुंतवणूक करणार्‍या भारतीयांची संख्या कमी नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. ती म्हणजे वाढते उत्पन्न आणि परदेशातील संपर्क. या कारणामुळेच परदेशात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय उत्सुक दिसून येतात. पण परदेशात मालमत्ता विकत घेताना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Investing in Property Abroad: परदेशात मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यात भारतातील फक्त उद्योजकच नाही तर उच्च पदस्थ नोकरदारांचाही समावेश आहे. एका सर्व्हेक्षणानुसार, परदेशात मालमत्ता खरेदी करणार्‍यांपैकी निम्मे लोक नोकरदार आहेत. मालमत्ता खरेदीसाठी दुबई, लंडन, न्यूयॉर्कपासून सिंगापूरपर्यंतच्या शहरांना प्राधान्य दिले जात आहे. परदेशात मालमत्ता खरेदी (Investment in Real Estate) करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या देशातच नवीन ठिकाणी जमीन खरेदी करताना अनेकांची फसवणूक होते. त्यात दुसऱ्या देशात प्रॉपर्टी घेताना फसवणूक होण्याची चिन्हे अधिक असतात.

काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन लिलावात फसवणूक झाल्याचा प्रकार कॅलिफोर्नियात उघड झाला. संकेतस्थळावर एक व्हिलाची किंमत 6 लाख रुपये दाखविली. तब्बल दीड कोटीचा व्हिला सहा लाखात मिळत असल्याचे पाहून गुंतवणूकदाराने लगेचच बोली लावली आणि पैसे जमा केले. प्रत्यक्षात मालमत्तेच्या ठिकाणी संबंधित गुंतवणूकदार गेला असता तेथे व्हिलाऐवजी 100 बाय 100 फुटाची एक मोकळी जागा त्याला विकण्यात आली होती. साईटवरील भलत्याच व्हिलाचा फोटो पाहून त्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली होती. म्हणून मालमत्ता भारतात किंवा परदेशात खरेदी करायची असली तरी त्याचा व्यवहार काळजीपूर्वक करायला हवा. परदेशातील प्रॉपर्टी खरेदी करण्याचे कायदे आणि टॅक्सच्या तरतुदी यांची माहिती करून घ्यायला हवी. परदेशात जमीन, मालमत्ता, घर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत काही टिप्स आपण जाणून घेऊ.

ज्या देशात मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आहे; अशा मंडळींनी तेथील नियमांची इत्यंभूत माहिती करून घ्यावी. काही देशांमध्ये इतर देशातील किंवा परदेशातील नागरिकांना मालमत्ता खरेदीची परवानगी दिली जात नाही. तर काही देशात विशिष्ट भागातच मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी दिली जाते. म्हणूनच कोणत्याही प्रकारची मालमत्ता घेण्यापूर्वी नियमांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

आरबीआयच्या संमतीविना भारतीय नागरिक स्थावर मालमत्ता खरेदीसाठी एका मर्यादेपर्यंतच पैसे परदेशात पाठवू शकतात.

या गुंतवणुकीपासून मिळणार्‍या उत्पन्नावर संबंधित गुंतवणूकदाराला भारतात टॅक्स (Tax) भरावा लागतो.

परदेशात टॅक्स भरलेल्या रकमेवर भारतात इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) भरताना टॅक्स सवलतीचा दावा करता येतो. यासाठी काही निकषांचे पालन करणे गरजेचे आहे.

भारतात किंवा परदेशात कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर कमी कालावधीत त्याची विक्री केल्यास त्यावर सरकारकडे कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) भरावा लागतो.  त्याचवेळी लाँग टर्म कॅपिटल गेन (Long Term Capital Gain) देखील लागू होऊ शकतो.

परदेशात मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी नुकसान टाळण्यासाठी संबंधित देशातील चलनाचे तिथल्या व्यवहारांची माहिती असणे गरजेचे आहे. मालमत्तेसंबंधी तेथील कायदे, स्थान, परिसर, विकासकांची गुणवत्ता आणि इतिहास, बाजारातील स्थिती याचीही माहिती ठेवणे आवश्यक आहे.