Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buyers Remorse: दिवाळीत खरेदी झाली, आता पश्चाताप होतोय, या गोष्टी टाळा

Buyers Remorse, Diwali Shopping , Buyers Remorse Situation

Buyers Remorse : दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या खरेदीचा काहींना पश्चात्ताप होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी घर आणि कार खरेदी सारखी मोठी खरेदी केली किंवा वस्तूची गुणवत्ता न आवडल्यास किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तू दिसते तशी न मिळाल्याने ग्राहकाला पश्चात्ताप होतो.

दिवाळीच्या निमित्ताने विविध वस्तू विक्रेते, कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या. या ऑफर्सना भुलून अनेकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. काहींनी तर या ऑफर्सना भुलून आलिशान गाड्या आणि नवीन वास्तू विकत घेतल्या. पण आता अशांना बायर्स रिमोर्सच्या स्थितीचा सामना करावा लागत आहे.

दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या खरेदीचा काहींना पश्चात्ताप होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी घर आणि कार खरेदी सारखी मोठी खरेदी केली  किंवा वस्तूची गुणवत्ता न आवडल्यास किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तू दिसते तशी न मिळाल्याने ग्राहकाला पश्चात्ताप होतो. त्याचप्रमाणे अनावश्यक असताना केलेल्या खर्चा नंतर काहींना पश्चात्ताप करावा लागतो या स्थितीला बायर्स रिमोर्स असे म्हणतात. अशा परिस्थितीत अनेकदा ग्राहकाला वस्तू परत करण्याची भावना निर्माण होते. ज्याप्रमाणे ग्राहकांना बायर्स रिमोर्सच्या स्थितीचा सामना करावा लागतो त्याप्रमाणेच वस्तू विक्रेत्यांनाही बायर्स रिमोर्सचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत अनेकदा ग्राहक खरेदी केलेली वस्तू विक्रेत्याला परत करतात. त्यामुळे विक्रेत्याला सुद्धा नुकसानीचा सामना करावा लागतो.  

बायर्स रिमोर्सची टाळण्यासाठी काय करावे (What to do to tackle buyers remorse) 

बायर्स रिमोर्सच्या अवस्थेत ग्राहकांना पश्चात्तापाच्या अवस्थेचा सामना करावा लागतो. ही अवस्था ग्राहक टाळू शकतो. ते कसे ते आता पाहूया.

वस्तूची खात्री असल्याशिवाय खरेदी करू नका 

अनेकदा वस्तूची आपल्याला असलेली गरज आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे अनावश्यक नसताना केवळ समाधानासाठी म्हणून आपण खरेदी करतो. त्यामुळे अनेकदा ग्राहक म्हणून आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊन आपल्याला बायर्स रिमोर्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे वस्तूची खात्री, उपयोगिता लक्षात घेऊनच वस्तूंची खरेदी करावी. त्यामुळे बायर्स रिमोर्सची अवस्था टाळण्यासाठी ग्राहकांनी वस्तूची खात्री नसल्यास किंवा वस्तूच्या गुणवत्तेविषयी साशंक असल्यास खरेदी करू नये.

सेल्स पासून दूर राहा 

अनेकदा सेल्सना भुलून ग्राहक वस्तूंची खरेदी करतात. ज्यामुळे नंतर त्यांना बायर्स रिमोर्सच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे विविध सेल्स पासून दूर राहून ग्राहक बायर्स रिमोर्सची परिस्थिती टाळू शकतात.  सणासुदीत जाहीर होणारे सेल्स, सवलत योजना यांची ग्राहकांनी खरेदीपूर्वी योग्य माहिती घेतली पाहिजे. सेल्समध्ये नेमकी काय सवलत दिली जाते याची खातरजमा करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा केवळ सेल्सच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता असते. 

विक्रेत्यांनी काय करावे (What to do to tackle buyers remorse situation for Sellers) 
वस्तूबद्दल खात्रीशीर माहिती द्या 

अनेकदा वस्तूंची विक्री करताना ग्राहकांना वस्तूंबद्दल योग्य आणि पुरेशी माहिती दिली जात नाही. परिणामी ग्राहक खरेदी केलेली वस्तू विक्रेत्याला परत करतो किंवा तो ग्राहक वस्तू खरेदीसाठी टाळाटाळ करतो. त्यामुळे विक्रेत्याला बायर्स रिमोर्सचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी विक्रेत्यांनी ग्राहकाला खरेदीपूर्वी वस्तूची खात्रीशीर माहिती द्यावी. जेणेकरून ग्राहकांमध्ये वस्तू खरेदीचा आत्मविश्वास निर्माण होईल.

ग्राहकांना पैशांपेक्षा अधिक महत्व द्या

विक्रेत्याने केवळ पैसे मिळवण्यासाठी म्हणून वस्तूची विक्री करू नये. असे केल्याने विक्रेत्याला बायर्स रिमोर्सच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. ते टाळण्यासाठी विक्रेत्याने ग्राहकांना पैशांपेक्षा अधिक किंमत देणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकांसोबत चांगलं रिलेशन मेंटेन ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पैशांना नाही तर ग्राहकांना किंमत द्या.