Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Facebook account: फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड विसरल्यास काय करावे? माहित करून घ्या

Facebook account

Facebook account: अनेकांना पासवर्ड रिसेट (Password reset) करण्याची प्रोसेस माहित आहे पण एखाद्याला टेक्निकल नॉलेज कमी असल्याने या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. मग दुसऱ्याला पासवर्ड रिसेट करून मागावा लागतो. तुम्हालाही अशा अडचणी येत असेल तर हा लेख वाचा.

Facebook account: फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. फेसबुकवर अकाऊंट नसलेली व्यक्ती क्वचितच असेल, पण अनेक जण त्यांच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड विसरतात. अनेकांना पासवर्ड रिसेट (Password reset)करण्याची प्रोसेस माहित आहे पण एखाद्याला टेक्निकल नॉलेज कमी असल्याने या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. मग दुसऱ्याला पासवर्ड रिसेट करून मागावा लागतो. तुम्हालाही अशा अडचणी येत असेल तर हा लेख वाचा. 

पासवर्ड दोन प्रकारे रीसेट केला जाऊ शकतो (Password can be reset in two ways)

फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड रीसेट (Password reset) करण्‍यासाठी, तुम्‍हाला प्रथम Facebook वेबसाइट उघडणे आवश्‍यक आहे. येथे तुम्हाला Forgot password वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येईल. जर तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट ईमेल आयडीने बनवले असेल तर तुम्हाला मोबाईल नंबरऐवजी ईमेल आयडी सबमिट करावा लागेल.

पासवर्ड बदलण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे (This is the easiest way to change the password)

तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटमध्ये लॉग इन केले असेल, तर तुम्हाला आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला चेंज पासवर्डवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला आधी जुना पासवर्ड टाकावा लागेल. त्याच वेळी, नवीन पासवर्ड पुढील कॉलममध्ये पोस्ट करावा लागेल आणि त्याची पुष्टी करावी लागेल. तुम्ही Save Changes वर क्लिक करताच तुमचा पासवर्ड बदलला जाईल.

जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तो असा बदला.. (If you forgot your password, change it to..)

तुमच्याकडे जुना पासवर्ड नसेल किंवा तो विसरला असेल तर तुम्हाला Forgot Password वर क्लिक करावे लागेल. यानंतर, सत्यापन कोड खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर पाठविला जाईल. त्याच्या मदतीने तुम्ही पासवर्ड बदलू शकता.