• 03 Oct, 2022 22:48

पॅनकार्ड हरवल्यास काय करायचे?

Pan Card

पॅनकार्ड (Pan Card) हे आजच्या काळात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅनकार्डशिवाय काही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाहीत. काही कारणामुळे तुमचे पॅनकार्ड हरवले असेल तर ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.

पॅनकार्ड (Pan Card) हे आजच्या काळात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅनकार्डशिवाय काही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाहीत. इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यापासून ते बँक खाते (Bank Account) उघडणे, व्यापार सुरू करणे, मालमत्ता खरेदी-विक्री (Property Sale-Purchased) करणे यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. पण काही कारणामुळे तुमचे पॅनकार्ड हरवले असेल तर ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. पण इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) पॅनकार्डधारकांना डिजिटल पॅनकार्ड (Digital Pan Card) डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे पॅनकार्ड हरवले असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घरबसल्या काही मिनिटात इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरून ई-पॅनकार्ड (E-Pan Card) डाऊनलोड करू शकता. बहुतांश आर्थिक संस्थांकडून अशा प्रकारच्या पॅनकार्डला मान्यता देण्यात आली आहे.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्येसुद्धा ई-पॅन (E-Pan Card) कार्ड ठेवू शकता. ही तुमच्यासाठी एक डिजिटल सोय आहे. पॅनकार्ड हा इन्कम टॅक्स विभागाकडून देण्यात आलेला दहा अंकी अल्फान्यूमेरिक नंबर आहे. तसेच ई-पॅन हे एक व्हर्च्युअल पॅनकार्ड असून त्याची गरज भासल्यास ई-व्हेरिफिकेशनसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. अर्थात इन्कम टॅक्स विभाग नागरिकांना वेळोवेळी पॅनकार्ड सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देत असतं. तसेच अनोळखी व्यक्तींना माहिती शेअर न करण्याचे देखील सांगत असतं. सध्या पॅनकार्डचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. बोगस पॅनकार्डच्या आधारे कर्जही घेतले जात आहे. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने सांभाळ करणे गरजेचं आहे.

आता आपण वेबसाईटवरून ई-पॅनकार्ड कसे डाऊनलोड करायचे. याची टप्प्यानुसार माहिती घेऊ. 

 • सर्वप्रथम एनएसडीएल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे 
 • होम पेजवर ई-पॅन कार्ड या टॅबवर क्लिक करावे
 • नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे तुमचा पॅन नंबर टाका
 • त्यानंतर आधार नंबर टाका
 • तुमची जन्मतारीख टाका
 • नियम आणि अटी वाचून त्यावर क्लिक करा
 • रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका
 • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा
 • त्यानंतर ई-पॅनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी शुल्क भरा
 • शुल्क भरल्यानंतर तुम्ही ई-पॅनकार्ड डाउनलोड करू शकता
 • ई-पॅनकार्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारीख टाका