Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Capital Fund: कॅपिटल फंड म्हणजे काय? याची मोजणी कशी केली जाते? जाणून घ्या सर्वकाही

Capital Fund

Image Source : https://www.freepik.com/

कॅपिटल फंडचा वापर प्रामुख्याने कंपनीच्या वाढीसाठी केला जातो. कॅपिटल फंडच्या माध्यमातून कर्ज फेडण्यास मदत तर मिळतेच, सोबतच कंपनीची स्थिती देखील सुधारते.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभारून व्यवसाय सुरू केला जातो. मात्र, एकूण भांडवलामध्ये रोख रक्कम, मालमत्तेसह कर्ज व इतर खर्चाचा देखील समावेश असतो. भांडवलावर कर देखील आकारला जातो. त्यामुळे भांडवल निधी (Capital Fund) म्हणजे काय हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. 

कॅपिटल फंड म्हणजे काय?

कॅपिटल फंड हे कोणत्या कंपनीची निव्वळ मालमत्ता असते. व्यवसाय करताना कंपनीच्या संपत्तीचे मालमत्ता (Assets) आणि देणेदारी (liabilities) असे दोन भाग पडतात. कंपनीच्या एकूण मालमत्तेमधून देणी वजा केल्यानंतर राहिलेल्या संपत्तीला कॅपिटल फंड असे म्हटले जाते. या कॅपिटल फंडचा वापर कंपनीच्या विकासासाठी केला जातो.

कॅपिटल फंड कसा मोजला जातो?

कंपनीच्या मालमत्तेमध्ये (Assets) रोख रक्कम, उपकरणे, प्लांट, जमीन इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. तर देणेदारीमध्ये (liabilities) कर्ज व इतर खर्चाचा समावेश असतो. मालमत्तेमधून देणी वजा करून कॅपिटल फंड मोजला जातो. देणीच्या तुलनेत मालमत्ता जास्त असल्यास कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे, असे समजले जाते. याशिवाय, कॅपिटल फंडमध्ये व्यवसाय सुरू करताना गुंतवलेली रक्कम, व्यवसायातून झालेला नफा व भविष्यात कंपनीच्या विकासासाठी राखून ठेवलेल्या निधीचा देखील समावेश होतो. 

समजा, कंपनीची मालमत्ता 25 लाख रुपये व देणेदारी 15 लाख रुपये आहे. तर अशावेळी मालमत्तेमधून देणेदारी वजा केल्यानंतर राहिलेली 10 लाख रुपये रक्कम कंपनीची कॅपिटल फंड असेल. 

कॅपिटल फंडचा वापर

  • कॅपिटल फंडचा वापर हा प्रामुख्याने व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केला जातो. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी कॅपिटल फंड खूपच महत्त्वाचा आहे.
  • कॅपिटल फंडच्या माध्यमातून कर्ज फेडण्यास मदत तर मिळतेच, सोबतच कंपनीची स्थिती देखील सुधारते.
  • कॅपिटल फंडचा वापर हा जमीन, उपकरणे खरेदीसाठी केला जातो.
  • तसेच, भागधारकांना लाभांश देण्यासाठी देखील कॅपिटल फंडचा वापर केला जाऊ शकतो.  

कॅपिटल फंडवर कर कसा आकारला जातो?

भारतात थेट कॅपिटल फंडवर कर आकारला जात नाही. मात्र, याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न जसे की व्याज, लाभांश आणि नफा यावर कर आकारला जातो. 

कॅपिटल गेन्स – कंपनीची मालमत्ता विक्री करून मिळालेल्या नफ्यावर हा कर आकारला जातो. कर आकारणी ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आणि लाँग टर्म कॅपिटल गेन्सच्या आधारावर वेगवेगळी असते. 

एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मालकी असलेली संपत्ती विकून मिळालेला नफा हा ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्समध्ये मोजला जातो. यावर 15 टक्के दराने कर आकारला जातो. तर लाँग टर्म कॅपिटल गेन्समध्ये इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन इत्यादींचा समावेश होतो. यावर 10 ते 20 टक्के दराने कर आकारला जातो.

व्याज आणि लाभांश -  कॅपिटल फंड वापरून केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर देखील कर आकारला जातो. याशिवाय, कंपनीद्वारे दिला जाणारा लाभांश देखील कराच्या कक्षेत येतो. यावर 15 टक्के दराने कर आकारला जातो.

उत्पन्न आणि गुंतवणूक – कॅपिटल फंडचा वापर व्यवसायाशी संबंधित गोष्टींसाठी केला असल्यास व त्यातून उत्पन्न प्राप्त झाल्यास त्यावर देखील कर आकारला जातो. तसेच, कॅपिटल फंडमधून निर्माण झालेला नफा पुन्हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास आयकर कायद्यांतर्गत त्यावर देखील कर द्यावा लागतो.