Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Underwriting in Insurance : इन्शुरन्समध्ये अंडररायटिंग काय आहे?

Underwriting in Insurance

Underwriting in Insurance : पॉलिसीधारकाने प्रीमियमची रक्कम दिली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी निघाली, असे सोपे गणित इन्शुरन्स क्षेत्रामध्ये नसते. आपण दिलेले प्रपोजल कंपनी ज्या टप्प्यावर स्वीकारते किंवा नाकारते, त्या टप्प्याला अंडररायटिंग (Underwriting) म्हणतात.

जेव्हा आपण कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून जीवन विना (Life Insurance) किंवा सामान्य विमा (General Insurance) घेतो, तेव्हा आपण इन्शुरन्स कंपनीला एका स्वरूपात प्रस्ताव म्हणजे proposal देत असतो.  पण आपण प्रपोजल आणि प्रीमियमची रक्कम दिली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी निघाली, असे सोपे गणित इन्शुरन्स क्षेत्रामध्ये नसते. कारण आपण दिलेले प्रपोजल विमा कंपनीने स्वीकारले पाहिजे आणि हे इन्शुरन्स प्रपोजल स्वीकारणे किंवा किंवा नाकारणे, हे ज्या प्रवेशद्वारावर निश्चित केले जाते, त्या टप्प्याला “अंडररायटिंग” किंवा “अंतर्लेखन” (Underwriting) म्हणतात. सादर केल्या गेलेल्या प्रपोजलसाठी आर्थिक जोखीम स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा काही विशिष्ट शर्तींच्या अधीन राहून जोखीम स्वीकारण्यास मान्यता द्यायची, हे  केवळ अंडररायटिंग या प्रोसेसवर अवलंबून असते. जोखमीचे वर्गीकरण करून समान जोखीम असल्याची खात्री करणे (Risk Classification and Assessment), हा अंडररायटिंगचा मुख्य उद्देश असतो.

कंपनी इन्शुरन्स पॉलिसी कशी वितरित करते! (How company distributes insurance policies)

नवीन पॉलिसी घेताना संबंधित पॉलिसीधारकाला इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना “प्रपोजल फॉर्म” (प्रस्ताव) भरून कंपनीकडे सादर करावा लागतो. “Utmost good faith” हे इन्शुरन्सचे मूलभूत तत्व आहे. म्हणजे त्या प्रपोजल फॉर्ममध्ये भरलेली माहिती सत्य असल्याचे इच्छुक पॉलिसीधारकाला शपथेवर लिहून द्यावे लागते आणि सोबत जोखमीच्या प्रकारानुसार आवश्यक ती डॉक्युमेंटस् जोडावी लागतात. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची “इन हाऊस” अंडररायटिंग टीम असते, ज्यामध्ये त्या कंपनीच्या गरजेनुसार विषयाचे तज्ज्ञ (डॉक्टर्स, CAs) कंपनीकडे आलेले प्रत्येक प्रपोजल आणि सोबतची डॉक्युमेंटस् काळजीपूर्वक तपासतात आणि प्रपोजलमधील जोखमीचा अंदाज घेऊन इन्शुरन्सचे प्रपोजल स्वीकारतात किंवा नाकरतात. उदाहरणार्थ - मेडिकल अंडररायटर्स लाईफ इन्शुरन्सचे प्रपोजल काही अटींसह स्वीकारतात किंवा जोखीम जास्त असल्यास अधिकचे प्रीमियम आकारून (म्हणजे “rate-up”) मंजुरी देतात किंवा प्रपोजल लांबणीवर टाकतात किंवा धोका / जोखीम निश्चित वाटल्यास अथवा प्रपोजल फॉर्ममध्ये भरलेली माहिती संशयास्पद वाटल्यास अंडररायटर्स  प्रपोजल नाकारतात.

काय आहेत अंडररायटिंगचे प्रकार (Types of Underwriting)

अंडररायटिंगचे मुख्यतः दोन प्रकार आहेत; मेडिकल अंडररायटिंग (Medical Underwriting) आणि नॉन-मेडिकल अंडररायटिंग (Non-Medical Underwriting). लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी प्रपोजलचे मेडिकल अंडररायटिंग करताना त्या व्यक्तीची फॅमिली हिस्ट्री, त्याचे सध्याचे मेडिकल स्टेटस, त्याच्या व्यवसायाचे स्वरूप आणि संभाव्य व्यावसायिक धोके, शिक्षण, निवासस्थान, त्याचा छंद आणि जीवनशैली, फायनान्शिअल स्टेटस, स्मोकिंग / ड्रिंकिंग (tobacco-alcohol) हॅबिट विचारात घेतले जाते. काही वेळेस व्यक्तीचे वय, लिंग, इन्शुरन्सची रक्कम (Sum assured), पॉलिसीचा प्रकार, पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय इत्यादी बाबी  विचारात घेऊन वैद्यकीय तपासणी न करता देखील प्रपोजल स्वीकारले जाते. अर्थात या “नॉन-मेडिकल अंडररायटिंग”साठी अंडररायटर्सची मान्यता लागते. जनरल इन्शुरन्समध्ये देखील मोटार इन्शुरन्स पॉलिसीचे अंडररायटिंग करताना देखील व्हेईकल रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, वैध पोल्युशन अंडर कंट्रोल (PUC) सर्टिफिकेट किंवा फायर इन्शुरन्ससाठी प्रपोजल सादर करत असताना जोखिमेचे स्वरूप आणि धोका सांगणारे तपशील, फायर ऑडिट सर्टिफिकेट जोडावे लागते. या व्यतिरिक्त फायनान्शिअल अंडररायटिंग, कॅटॅस्ट्रोफिक अंडररायटिंग, रिस्क अंडररायटिंग, रिइन्शुरन्स अंडररायटिंग असे विविध प्रकारच्या प्रोसेसमधून स्वीकारत असलेल्या जोखीमचे अंडररायटिंग केले जाते.  

अंडररायटर्सचा निर्णय इन्शुरन्स कंपनीसाठी अत्यंत महत्वाचा!

व्यक्तीचे अल्प उत्पन्न असतानाही मोठ्या Sum Assured ची पॉलिसी खरेदी करत असल्यास, वाढत्या वयात जास्त रक्कमेचा इन्शुरन्स घेत असल्यास, राहत्या घरापासून दूरच्या ठिकाणी इन्शुरन्स प्रपोजल सादर करत असल्यास किंवा दूरच्या ठिकाणी मेडिकल चेक-अप करत असल्यास अथवा कोणताही टर्म प्लॅन (मुदतीचा विमा) साठीचे प्रपोजलसंबधी अंडररायटर्सचा निर्णय इन्शुरन्स कंपनीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. लवचिक अंडररायटिंग कंपनीची जोखीम वाढवतो आणि मोठा धोका स्वीकारल्यास क्लेमच्या वेळी कंपनीच्या बॅलन्स-शीटवर विपरीत परिणाम होतो. 

अतिशय कठोर निर्बंधांखाली अंडररायटिंग केल्यास कंपनीकडे आवश्यक तेवढा प्रीमियमचा संचय होत नाही आणि तिच्या जोखीम सुरक्षित करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात आणि कंपनीची आर्थिक आणि व्यायसायिक वृद्धी मंदावते. तेव्हा इतकेच म्हणता येईल की, It is not final until the underwriter agrees.