8 A Utara and 7/12 Utara: 8 A उतारा आणि 7/12 उतारा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत, पण कन्फ्युज करणाऱ्या आहेत. म्हणून 8 A उतारा आणि 7/12 उतारा म्हणजे नेमक काय? हे माहित असायला हवं. सातबारामध्ये आपण बघितले तर प्रत्येक जमीन मालकाची हक्काची जमीन सगळी एकाच गटात लिहिलेली असते. पण एकाच मालकाची जमीन वेगवेगळ्या ठिकाणी असू शकते, वेगवेगळ्या गट नंबर मध्ये सुद्धा असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या नावावर चार जमीन असतील तर, त्या चारही जमिनी एकत्रितरित्या कशावरती दिसतील? या चारही जमिनी ज्यावर दिसू शकतात ते म्हणजे आठ अ चा नमुना. 8 A उतारा आणि 7/12 (8 A Utara and 7/12 Utara) उतारा यामध्ये नेमका फरक काय? हे जाणून घेऊया.
सिलिंग कायदा 1961आणि 8 अ उतारा (Ceiling Act 1961 and 8 A Utara)
एका शेतकऱ्याच्या नावावर अनेक गटांमध्ये येथे जमिनी आपल्याला दिसतात, तर याचा मुख्य उपयोग हा तलाठ्याला होतो. एखादा शेतकरीच महसूल भरायला गेला तर तलाठी उतारा बघून त्याचे कुठल्या कुठल्या गटांमध्ये जमिनी आहेत आणि त्याचा महसूल किती आहे. हे सहज चेक करू शकतो. एकाच वेळी सर्व जमिनीचा महसूल तिथे तलाठ्याकडे शेतकरी भरू शकतो. दुसरा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्याकडे सिलिंग कायदा (Ceiling Act 1961)आला, तर एक व्यक्तीच्या नावावर किती जमीन महाराष्ट्रात राहू शकते हे ठरविण्यात आले. त्यावरून तुम्हाला समजू शकते की त्या गावात त्या शेतकऱ्याची एकूण किती जमीन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असेल तर ते सगळे '8 अ उतारा' एकत्र केल्यानंतर किती जमीन होते हे समजून येते. चार पाच गावांचे एकत्र करून सिलिंग पेक्षा जास्त जमीन होते की नाही हे समजण्यासाठी सुद्धा 8 अ उपयोगी पडते.
8 A उतारा आणि 7/12 उतारा यातील फरक (Difference between 8 A Utara and 7/12 Utara)
7/12 उतारा | 8अ उतारा |
जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ, वर्तमानकाळात असलेला त्या मालमत्तेचा मालक या सर्व बाबी दर्शविणारा कागद म्हणजे सातबारा उतारा होय. | आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. |
आपल्या नावांवर असणार्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12उतारा असतो. | आपल्या नावावर असणार्या सर्व गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ वर एकत्रीत नोंद असते. |
जमिनीची मालकी, त्या जमिनीवरील पिके,एकूण क्षेत्र, कर्ज ही माहिती समजते. | आपल्या जमिनीवरील कर किती आहे हे समजून येते. |
एकाच जमिनीच्या वेगळ्या भागासाठी सुद्धा सातबारा उतारा मिळतो. | जमिनीचे क्षेत्र वैयक्तिक आहे की सामायिक हे माहित होते. |
यातून एकाच व्यक्तीच्या नावावरील वेगवेगळ्या ठिकाणी असलेली जमीन माहित होत नाही त्यामुळे सीलिंग कायद्यासाठी उपयुक्त नाही. | सीलिंग कायद्यासाठी उपयुक्त ठरते. |