Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Investment: निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या

Property Investment

Image Source : https://www.freepik.com/

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.

सर्वसाधारणपणे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा चांगला मानला जातो. मात्र, निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा. तुम्ही देखील निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असाल तर त्याआधी याचे फायदे-तोटे समजून घ्या.

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मोठी गुंतवणूकइतर गोष्टींच्या तुलनेत घर अथवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमची आर्थिक स्थिती व उत्पन्न लक्षात घ्यायला हवी. तुम्ही मालमत्ता खरेदीच्या उद्देशाने वर्षांनुवर्ष बचत केलेली असल्यास यात गुंतवणूक करण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो.
खरेदीचा उद्देशनिवृत्तीनंतर मालमत्ता का खरेदी करत आहात? याचा आधी विचार करायला हवा. नियमित उत्पन्न सुरू व्हावे की केवळ गुंतवणूक हा उद्देश आहे? हे ठरवा. नियमित उत्पन्नाच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करणे चांगले आहे. मात्र, केवळ गुंतवणूक करायची असल्यास इतरही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
तुमच्यानंतर मालमत्तेचे काय?वयाची 60-70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मालमत्ता खरेदी करणे जोखमीचे असते. कारण, या काळात उत्पन्न थांबलेले असते व आरोग्य सेवांसाठी भरमसाठ पैसे खर्च होतात. तसेच, तुमच्यानंतर मालमत्तेची मालकी कोणाकडे असेल? याचाही विचार करायला हवा.

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे फायदे

नियमित उत्पन्ननिवृत्तीनंतर मालमत्ता खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा हा नियमित उत्पन्न आहे. घर असो अथवा व्यावसायिक मालमत्ता यातून भाड्याच्या स्वरुपात तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकते.
मालमत्तेच्या किंमतीत वाढमालमत्तेच्या किंमतीत या दिवसेंदिवस वाढत चालल्यात आहेत. त्यामुळे तुम्ही निवृत्तीनंतर मालमत्ता खरेदी केल्यास काही वर्षांनी त्याच्या किंमतीत वाढ होणारच आहे. भविष्यात ही मालमत्ता विकून नफा कमवू शकता.
सुरक्षित गुंतवणूक  इतर गोष्टींच्या तुलनेत मालमत्तेमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. सर्वसाधारणपणे या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता कमी असते. मात्र, मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी.
भाडे भरण्याची गरज नाहीस्वतःची मालमत्ता असल्याने दरमहिन्याला भाडे भरण्याची गरज पडत नाही. याशिवाय, दरवर्षी घरमालकाच्या भाडेवाढीचा सामनाही करावा लागत नाही.
कुटुंबासाठी आधारनिवृत्तीनंतर खरेदी केलेली मालमत्ता भविष्यात तुमच्या कुटुंबासाठीचा आधार बनू शकते. तुमच्यानंतर मुलांना वारसा हक्काने ही मालमत्ता प्राप्त होईल.

निवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचे तोटे

अनावश्यक गुंतवणूक केवळ गुंतवणूक म्हणून मालमत्ता खरेदी करणे तोट्याचे ठरू शकते. स्टॉक्स, बाँड्स, म्युच्युअल फंड, पेन्शन योजना असे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एकदम मोठी रक्कमही गुंतवावी लागत नाही.
अनावश्यक खर्च मालमत्ता खरेदी केल्यावर देखभालीसाठीही अतिरिक्त खर्च येतो. त्यामुळे यातून उत्पन्न प्राप्त होत नसल्यास कर, विमा, देखभाल आणि दुरुस्तीच्या अतिरिक्त खर्चाचा भार तुमच्यावर पडेल.
विक्रीअचानक पैशांची गरज भासल्यास अशा स्थितीमध्ये त्वरित मालमत्तेची विक्री करता येत नाही. मालमत्तेच्या तुलनेत सोने, स्टॉक्सची त्वरित विक्री करता येते. याशिवाय, मालमत्ता रिकामी राहिल्यास नियमित मिळणारे उत्पन्नही थांबते.