What is 8 A Utara?: ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आणि शेतकऱ्यांना असाल तर तुम्हाला, सात बारा, नोंदी, आठ अ चा उतारा, मोजणी अशा गोष्टी परिचयाच्या असतील. अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नसते. आठ अ चा उतारा म्हणजे काय? (What is 8 A Utara?) तो कसा वाचायचा याची याबद्दल माहिती घेऊया. साधारणपणे आपल्याला सातबाऱ्यातून जमिनीची मालकी, त्या जमिनीवरील पिके,एकूण क्षेत्र, कर्ज अशा अनेक गोष्टी माहित होतात. पण अनेकांना आठ अ चा उतारा कळत नाही. तो कसा काढायचा? त्याचा काय फायदा असतो याचीदेखील माहिती नसते. आठ च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील जमिनींविषयी सगळी माहिती मिळते, जाणून घेऊया आठ अ चा उतारा म्हणजे काय?
'आठ अ चा उतारा' म्हणजे काय? (What is 8 A Utara?)
एकाच मालकाची वेगवेळ्यात गटात असलेली एकूण जमीन दाखवणारे व प्रशासनाला कर (Tax) गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरणारे महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे आठ अ चा उतारा होय. जमिनीची खरेदी विक्री करतांना ती जमीन नक्की कुणाच्या मालकीची आहे याची माहिती मिळते. फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सर्वात महत्वाचे असलेले डॉक्युमेंट्स म्हणजे 'आठ अ चा उतारा' होय.
'आठ अ चा उतारा' कुठून आणि कसा मिळवायचा?
- महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर विभाग या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- आठ अ वर क्लिक करा.
- त्यांनतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करायचे.
- खाते नंबर (Account number) क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहायचा.
- त्यांनतर सर्चवर क्लिक करा, तुमचा आठ अ चा उतारा तुमच्या समोर येईल.
ऑनलाईन आठ अ चा उतारा वाचायचा कसा? (How to read 8 A Utara?)
कॉलम | नोंदी |
पहिला कॉलम | गाव नमुना सहामधील नोंद हा पहिला रकाना असतो त्यामध्ये खातेदाराचा नोंद क्रमांक असतो. त्याचबरोबर जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे किंवा सामायिक आहे हे सुद्धा या रकाण्यातून कळते. |
दुसरा कॉलम | या रकान्यात भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक असतो. त्या कॉलममध्ये खातेदाराच नाव त्याचबरोबर जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे त्या रकाण्यात असतात. यामधून प्रत्येकाच्या नावावर किती जमीन आहे हे आपल्याला समजते. |
तिसरा कॉलम | या कॉलममध्ये व्यक्तीच्या नावावर क्षेत्र आहे हे समजून येते. |
चौथा कॉलम | चौथा कॉलम हा कर आकारणीचा असतो. यामध्ये प्रत्येक जमीनीवर किती कर लावलेला आहे , हे समजून येते. |
पाचवा कॉलम | पाचवा कॉलम हा दुमला जमिनीवरील नुकसान हा असतो. |
सहावा कॉलम | हा स्थानिक करांचा कॉलम आहे. याचे दोन उपप्रकार आहेत. सहा ( अ ) मध्ये जिल्हापरिषदेने जमीनीवर किती कर लावला आहे हे समजते. आणि सहा ( ब ) मध्ये ग्रामपंचायतीने किती कर लावला आहे हे समजून येते. |
सातवा कॉलम | या कॉलममध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते. यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो हे लक्षात येते. |