Bitcoin price drops again: जगातील सर्वात विश्वासार्ह क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन होय. गेल्या काही काळापासून बिटकॉईनसह इतर सर्व नाण्यांना उतरती कळा लागली आहे. मात्र मागील आठवड्यापासून बिटकॉईन, इथरियममध्ये थोडी स्थिरता दिसून येते आहे. ही स्थिरता काही प्रमाणात आज दिनांक 27 डिसेंबर रोजीही दिसून येत आहे. तरी बिटकॉईनचा दर घसरला आहे आणि इतरियमचा वधारला आहे. मागील चोवीस तासात अनेक नाण्यांमध्ये चढ आणि उतार दिसून आले आहेत. शनिवारनंतर पुन्हा एकदा द टेरा क्लासिक (The Terra Classic) नाण्याने मागील चोवीस तासांमध्ये 8 टक्के एवढी मोठी वाढ नोंदवली आहे. तर, चेन (Chain) या नाण्याचे दर तब्बल 7 टक्क्यांनी घटले आहेत. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 812.94 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.02 टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
- बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 880 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.12 टक्के घसरण झाली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.45 लाख एवढा आहे.
- इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याने मागील चोवीस तासांमध्ये 0.15 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 223 युएस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.05 लाख एवढा आहे.
- डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.07513 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 1.42 टक्क्यांनी घसरला. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.52 रुपये आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 1.93 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या नाण्याची किंमत 70.42 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 900 रुपये आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3596 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 2.68 टक्क्यांनी वाढली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 30.52 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 1.39 टक्क्यांनी घसरण झाली असून, याची किंमत 11.26 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 1 हजार 9 रुपये एवढी आहे.