Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Time to Trade: इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ‘बेस्ट टाईम टू ट्रेड’ काय असतो?

what is the best time to trade

Best Time to Trade: अनेक गुंतवणूकदारांच्या मते भारतीय शेअर मार्केटमध्ये अशी एक वेळ आहे; ज्यामध्ये ट्रेडिंग करणे फायद्याच ठरू शकते. ही वेळ कोणी ज्योतिषाने, पंडिताने किंवा कोणत्याही मौलवीने दिलेली नाही. तर ही वेळ मार्केटमधील तज्ज्ञांनी सांगितलेली आहे.

भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक ठराविक वेळ पाळली जाते. ज्यामुळे ते कार्य उत्तमपणे पार पडते.  त्याला भारतीय संस्कृतीत मुहूर्त असे म्हटले जाते. आपल्याकडे अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत; ज्या मुहूर्त पाहून केल्या जातात. जर सर्व महत्त्वाच्या कामांसाठी मुहूर्त असू शकतो तर मग ट्रेडिंगसाठी मुहूर्त का नाही? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आपण त्याबद्दल नक्कीच जाणून घेणार आहोत. पण आपण वर्षातून एकदा असणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल नव्हे तर इंट्राडे ट्रेडिंगमधील प्रत्यक्ष आणि खऱ्या मुहूर्ताबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक गुंतवणूकदारांच्या मते भारतीय शेअर मार्केटमध्ये अशी एक वेळ आहे; ज्यामध्ये ट्रेडिंग (Trading) करणे फायद्याच ठरू शकते. ही वेळ कोणी ज्योतिषाने, पंडिताने किंवा कोणत्याही मौलवीने दिलेली नाही. तर ही वेळ मार्केटमधील तज्ज्ञांनी सांगितलेली आहे. तर आज आपण याच वेळेबद्दल म्हणजे, इंट्राडे ट्रेडिंग (Intra Day Trading)मधील बेस्ट टाईम टू ट्रेड बद्दल जाणून घेणार आहोत.

बेस्ट टाईम टू ट्रेड (Best time to Trade)

शेअर मार्केट (Share Market) जेव्हा ओपन होते, तेव्हा मार्केटमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये लगेच चढ-उतार होत असलेले आपण पाहतो. हे चढ-उतार कशामुळे होत असतील? शेअर मार्केट हे नेहमीच अस्थिर असते आणि हीच अस्थिरता मार्केट सुरु झाल्यावर पहिल्या तासात किंवा आठवड्याच्या सुट्टीनंतर जेव्हा मार्केट ओपन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात जाणवते. तेव्हा मार्केटमध्ये गॅपअप ओपनिंग (Gap Up Opening) किंवा गॅपडाऊन ओपनिंग (Gap Down Opening) झाल्याचे आपण पाहतो. तर यामागे मार्केट बंद झाल्यानंतर आफ्टर हावर मार्केट (After Hour Market) ट्रेडिंगद्वारे येणाऱ्या ऑर्डर्स कारणीभूत असतात. मार्केट ओपन झाल्यावर सर्वप्रथम याच ऑर्डर्स एक्झिक्यूट होतात. त्यामुळे अस्थिरतेत अजून वाढ होते आणि मार्केटमध्ये किमतींची उलाढाल दिसून येते. याच अस्थिरतेला टाळण्यासाठी अनेक मार्केट तज्ज्ञांनी मार्केट सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या तासात ट्रेडिंग करण्यापासून साफ नकार दिला आहे.


त्याचप्रमाणे मार्केट जेव्हा बंद होते तेव्हा देखील अस्थिरतेमध्ये अशीच वाढ दिसून येते. या वाढीमागील कारण म्हणजे इंट्राडे ट्रेडर्सच्या स्क्वेअरिंग ऑफ (Squaring Off) ऑर्डर्स. ट्रेड हेज (Hedge) करण्यासाठी केले जाणारे स्क्वेअर ऑफ (Square Off) मार्केट बंद होण्याच्या वेळेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंट्राडे ट्रेडर्स यावेळेत स्क्वेअर ऑफ ऑर्डर्स जनरेट व एक्सझिक्यूट करत असतात. त्यामुळे मार्केट बंद होण्याच्या अर्धातास आधी कोणतीही ट्रेडिंग करण्यासाठी तज्ज्ञांनी साफ नकार दिला आहे.

हीच ती ट्रेडिंगची शुभ मुहूर्ताची वेळ!

मार्केट सुरु झाल्यानंतरचा एक तास म्हणजेच 9.15 ते 10.15 पर्यंत व मार्केट बंद होण्याआधी एक तास म्हणजेच 2.30 ते 3.30 पर्यंत शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता असते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करणे कठीण होते. 10.15 ते 2.30 ही वेळ इंट्राडे ट्रेडिंगसाठी योग्य असल्याचे एक्सपर्ट सांगतात. सकाळची मार्केटमधील वाढलेली अस्थिरता 10.10 किंवा 10.15 पर्यंत कमी होते. त्यामुळे 10.15 नंतर ट्रेडिंग केल्याने कमी अस्थिरतेचा फायदा उचलणे शक्य होऊ शकते. त्याचसोबत तुमच्या स्क्वेअर ऑफ ऑर्डर्स 2.30 पर्यंत जनरेट करून एक्झिक्यूट करणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे मार्केटमधील वाढीव अस्थिरता टाळणे शक्य होते. 

शेअर मार्केटमध्ये नव्याने पाऊल ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी इंट्राडे ट्रेडिंगचा 10.15 ते 2.30 हा शुभ मुहूर्त मानायला काहीच हरकत नाही.