शेअर बाजारात दीर्घ कालावधीत परतावा मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे गुंतवणूक केली जाते, त्यापप्रमाणे intraday Trading करणाऱ्यांचीही संख्या खूप जास्त असते. त्याच दिवशी शेअर्स खरेदी करून बाजार बंद होण्यापूर्वी विक्रीची प्रक्रियाही पूर्ण केली जाते. यात जोखीम अधिक मानली जाते. शेअर मार्केटमध्ये डे ट्रेडिंग किवा intraday Trading चे आकर्षण असणारा एक मोठा वर्ग दिसून येते. त्यांच्यासमोर किती रुपयांनी याची सुरुवात करावी असा प्रश्न उपस्थित होतो. Intraday Trading मध्ये जोखीम जास्त असल्याने याचा व्यवस्थित विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते.
ट्रेडर्सकडून होते ‘ही’ चूक
आपल्याकडे ट्रेडिंग करण्यासाठी किती रक्कम आहे, ते ठरवून त्यातील थोडीच रक्कम अगोदर गुंतवणे आदर्श मानले जाते. काही वेळा असे होते, समजा शेअर मार्केटसाठी 1 लाख रुपये इतकी रक्कम बाजूला काढली असेल तर तेवढी सगळी रक्कम गुंतवली जाते. सुरुवातीच्या काळात मार्केटचा अभ्यास नसल्याने नुकसान होण्याची शक्यता जास्त राहते. यामुळे फारच थोड्या कालावधीत उपलब्ध असणारी रक्कम संपते. यामुळे ट्रेडिंगपासून दूर राहावे लागते. किवा सुरुवातीलाच मोठे नुकसान झाल्याने शेअर बाजाराविषयी नाकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता असते.
1 हजार रुपयाने देखील करू शकता सुरुवात
Intraday Trading करायला सुरुवात करताना तुमच्याकडे फार मोठी रक्कम असायला हवी असे नाही. अगदी हजार रुपयाने देखील तुम्ही सुरूवात करू शकता. अनेकदा तसे करणेच योग्य असल्याचे ट्रेडिंगमधील जाणकार सांगतात. सुरुवातीच्या टप्प्यात नुकसान होण्याची शक्यता तुलनेने जास्त मानली जाते. यामुळे कमी पैसे गुंतवले असतील तर नुकसानीचा धोका जास्त राहत नाही. कित्येकवेळा थिअरीपेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग करतानाच अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मात्र या प्रक्रियेत मोठी रक्कम गुंतवली तर शिकण्याच्या प्रक्रियेसाठी एवढा धोका पत्करणे योग्य ठरत नाही.
यामुळे intraday Trading मध्ये कमी पैशात गुंतवणूकीची सुरुवात करून सुरुवातीला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची जास्त गरज असते. कितीही पैसे गुंतवून तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करू शकता. मात्र कमीत कमी रक्कम सुरुवातीला गुंतवावी, आपल्या ट्रेडचे analysis करावे , हे जर योग्य दिशेने पुढे गेले तर 6 महिन्यात आत्मविश्वास काढू शकतो. नॉलेज वाढू शकतो. या कालावधीत जवळपास 100 ट्रेड केल्या तरी त्यातून पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते आणि गुंतवणूकीचे प्रमाण वाढवत येते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)