Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Diwali Muhurat Trading 2022: मुहूर्त ट्रेडिंगवेळी काय करावे काय करू नये!

Diwali Muhurat Trading 2022

Diwali Muhurat Trading 2022: मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान एक महत्त्वाची टाळायची गोष्ट म्हणजे, ऑप्शन्समध्ये व्यवहार न करणे. या प्रकारात खूप जास्त जोखीम असते. नुकसानीच्या शक्यतेमुळे तुमच्या पोर्टफोलिओचा नूर बदलू शकतो. गुंतवणूकदाराने सर्वात आधी साधकबाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे.

शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जायचे अन् कोणत्या नाही यासाठी सदैव सतर्क व दक्ष राहण्याची गरज आहे. या काळात आयपीओंचा प्रवाह सुरू होतो.कारण,व्यावसायिक कंपन्यांना या शुभ प्रसंगाचा लाभ घेऊन गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा फायदा उचलू पाहतात.मात्र कोणत्याही नुकसानीपासून वाचण्यासाठी आणि ट्रेडिंगच्या सुज्ञ युक्त्यांच्या माध्यमातून काय करावे अन् काय करू नये, याचे पालन करायला हवे. (Do and Don't in Muhurat Trading)

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे:

टोकन खरेदी: प्रतीकात्मक संकेत आणि इक्विटी बाजारात प्रवेश करण्याचे साधन अशा दोन्ही रूपांत प्राथमिक गुंतवणूक म्हणून तुम्हाला टोकन खरेदी करता येईल. जी तुम्हाला भरभराट आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा देऊ शकेल. नव्या गुंतवणूकदारांना व्यावहारिक उद्देशांकरता ही इक्विटी बाजारात प्रवेश करण्याची अचूक वेळ समजली जाते. यामागील मुख्य कारण म्हणजे, मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान बाजार सामान्यपणे कमी अस्थिर असतो, असे समजले जाते. कारण, या सत्रात व्यापाऱ्यांचा कल स्टॉक्सची विक्री करण्याऐवजी त्यांची खरेदी करण्याकडे जास्त असतो.

ब्ल्यूचिप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा: मुहूर्त ट्रेडिंगच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे, विश्वासार्ह आणि दर्जेदार स्टॉक्सची खरेदी करणे. बहुतांश लार्ज-कॅप स्टॉक्स साधारणत: उच्च मूल्यांकन पातळीवर व्यवहार करत असतात. विशेष करून मुहूर्त ट्रेडिंग काळात दीर्घ कालावधीच्या दृष्टीने ब्ल्यू चिप स्टॉक्सची निवड करण्याचा सल्ला देण्यात येतो. जेणेकरून तुमच्या पोर्टफोलिओला मजबूती देऊन स्थैर्य आणता येईल.

पोर्टफोलिओ पुनर्गठन आणि ऑप्टिमायजेशन: सरत्या वर्षाचे सिंहावलोकन आणि नवीन सुरुवात करण्यासाठी दिवाळीचा काल आदर्श मानला जातो. नवीन उद्दिष्ट्ये आणि गुंतवणुकीसाठी नव्या क्षीतिजांच्या आधारावर गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन आणि फेरआखणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. खप आधारित कंपन्यांच्या स्टॉक्सवर नजर टाकून तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओत आणखी वैविध्यही आणता येईल. दुहेरी अंकांच्या विकासदरावर स्वार झालेली योग्य क्षेत्रे (उदा-एफएमसीजी) किंवा उपक्षेत्रांबाबत (उदा- ग्रामीण वापर) जाणून घेऊन तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक लक्षात घेता योग्य स्टॉक्सची निवड करू शकता.

मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान काय करू नये:

मोठ्या ऑर्डर्स देऊ नका: मुहूर्त ट्रेडिंगचा अवधी अगदीच कमी असतो (केवळ तासाभरापुरता). त्यामुळे त्याता रोखीच्या तरलतेला मर्यादा असतात. यामुळे तुम्ही मोठ्या ऑर्डर करणे टाळले पाहिजे.

लक्ष विचलित होऊ देऊ नका: क्षण आणि सणासुदीच्या उत्साहाच्या भरात आपण वाहून जाऊ शकतो. यामुळे मी तुम्हाला मूलभूत तत्त्वांचे पालन करण्यावर ठाम राहण्याचा सल्ला देतो. एखादा शुभ दिवस हा हमखास कमाईचा दिवस आहे, अशी खात्री नसते. उपरोक्त यादीतील काय करावे यातील मुद्द्यांचे पालन करा. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीच्या अवधीकडे लक्ष पुरवत टोकन खरेदीवर ठाम राहा.

अफवांना बळी पडणे टाळा: एक परिपाठ नेहमी असायला हवा. तो म्हणजे, प्रत्येक गुंतवणूक ही सखोल संशोधन आणि योग्य सल्लामसलतीनंतर करायला हवी. स्टॉक्स किंवा इतर कोणत्याही तत्सम गोष्टींत गुंतवणूक करते वेळी कधीही अफवा, अटकळी आणि आगापिछा नसलेल्या टिप्सच्या मागे धावू नका. किंबहुना त्यांना आपला निवडींचा मार्गदर्शकही बनू देऊ नका.

मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान आणखी एक महत्त्वाची टाळायची गोष्ट म्हणजे, ऑप्शन्समध्ये व्यवहार न करणे. या प्रकारात खूप जास्त जोखीम असते. नुकसानीच्या शक्यतेमुळे तुमच्या पोर्टफोलिओचा नूर बदलू शकतो. प्रत्येक गुंतवणूकदाराने सर्वात आधी साधकबाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे. यानंतर त्याने आपल्या गरजांच्या अनुरूप सर्वोत्तम असलेल्या ट्रेडिंगच्या साधनांकडे वळले पाहिजे.