• 07 Dec, 2022 08:36

स्टेबलकॉईन म्हणजे काय? What is Stablecoin?

Stablecoin cryptocurrency

स्टेबलकॉईन हा एक क्रिप्टोकरन्सीचा प्रकार आहे. अस्थिर क्रिप्टोकरन्सीजला पर्याय शोधण्यासाठी चार्ल्स हॉस्किन्सन आणि डॅन लॅरीमर (Charles Hoskinson and Dan Larimer) यांनी स्टेबलकॉईन बीट युएसडी (First Stablecoin BitUSD)ची निर्मिती केली होती.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील अस्थिरता (Volatility) आपल्या सर्वानाच माहिती आहे. आज एक स्थिती तर उद्या दुसरी, असंच काहीसं दृश्य मार्केटमध्ये पाहायला मिळतं. अशा अस्थिर आणि अनिश्चित मार्केटमध्ये (Volatile and uncertain market) गुंतवणूक करण्यास आलेले गुंतवणूकदार अनेकवेळा घाबरून चुका करतात व स्वत:चे नुकसान करून घेतात. मग प्रश्न निर्माण होतो की, अशा अस्थिर क्रिप्टोकरन्सीज्ना पर्याय काय? हाच प्रश्न सोडविण्यासाठी चार्ल्स हॉस्किन्सन आणि डॅन लॅरीमर (Charles Hoskinson and Dan Larimer) यांनी सर्वप्रथम स्टेबलकॉईन बीट युएसडी (First Stablecoin BitUSD)ची निर्मिती केली होती. तर आज आपण स्टेबलकॉईन म्हणजे नेमके काय? हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्टेबलकॉईन म्हणजे काय? What is Stablecoin?

स्टेबलकॉईन हा एक क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) प्रकार आहे. ज्याचे मूल्य दुसरे चलन, वस्तू किंवा आर्थिक साधनाशी एकप्रकारे बांधलेले असते. स्टेबलकॉईन्स बनवण्यामागचे उद्दिष्ट क्रिप्टोकरन्सीमधील अस्थिरतेवर उपाय काढणे हे होते. बिटकॉईन आणि इतर प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीजमधील अस्थिरता गुंतवणूकदारांच्या फायद्याची असते. जेव्हा किंमत वर जाते किंवा खाली जाते. तेव्हा त्यातून काहीजण फायदा मिळवतात. पण जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराचे नुकसान होत असते तेव्हा तो त्या कॉईन्सचा वापर इतर वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी करतो. क्रिप्टोमार्केटमध्ये कॉईन्सच्या किमतीत सतत होणारे बदल व्यवहार पार पाडण्यात अडथळा निर्माण करतात. क्रिप्टोकरन्सीजना विनिमयाचे माध्यम असे म्हटले जाते. पण जर क्रिप्टोकरन्सी अशीच अस्थिर राहिली तर ती विनिमयाचे माध्यम म्हणून वापरणे कठीण होऊन जाते. स्टेबलकॉईन्स क्रिप्टोकरन्सीच्या (Stablecoin Cryptocurrency) ह्याच प्रश्नाचा तोडगा आहे. ज्यामध्ये कॉईन्सची किंमत वेगवेगळ्याप्रकारे स्थिर ठेवली जाते.

स्टेबलकॉईन्सचे प्रकार

स्टेबलकॉईन्सना स्थिर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेच्या आधारे स्टेबलकॉईन्सचे तीन प्रकार पडतात.

फियाट-कोलॅट्रलाईज्ड स्टेबलकॉईन्स (Fiat-collateralized Stablecoins)

फियाट-कोलॅट्रलाईज्ड स्टेबलकॉईनच्या मूल्याची खात्री देण्यासाठी युएस डॉलर सारख्या अधिकृत चलनाचा वापर करतात. क्रिप्टोमार्केटमध्ये दुय्यम किंवा पर्यायी वस्तू म्हणून सोनं किंवा चांदीसारखे मौल्यवान धातू तसेच कच्चे तेल यासारख्या वस्तूंचा देखील वापर केला जातो. अशाप्रकारे विविध कमॉडिटींचे राखीव साठे स्वतंत्रपणे ठेवले जातात आणि वेळोवेळी त्याचे ऑडिट केले जाते. टिथर (USDT) आणि TrueUSD (TUSD) हे यूएस डॉलरद्वारे समर्थित केले जाणारे लोकप्रिय स्टेबलकॉईन्स आहेत.

क्रिप्टो-कोलॅट्रलाईज्ड स्टेबलकॉईन्स (Crypto-collateralized Stablecoins)

क्रिप्टो-कोलॅट्रलाईज्ड स्टेबलकॉईन्स आपले राखीव म्हणून इतर क्रिप्टोकरन्सीजचा वापर करतात. राखीव म्हणून वापर होत असलेल्या इतर क्रिप्टोकरन्सीजमध्ये अस्थिरता असते; ज्यामुळे अनेकवेळा राखीव ठेवलेल्या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य संबंधित स्टेबलकॉईनचे मूल्य ओलांडते. 2 मिलिअन डॉलर्स किमतीची क्रिप्टोकरन्सी क्रिप्टो-बॅक्ड स्टेबलकॉईनमध्ये जारी करण्यासाठी 1 मिलिअन डॉलर राखीव म्हणून ठेवला जातो. याचे एक उदाहरण म्हणजे मकर दाओ यांची दाई (MakerDao-Dai) ही क्रिप्टोकरन्सी राखीव म्हणून युएस डॉलर आणि इथेरियमचा वापर करते.

अल्गोरिदमिक स्टेबलकॉईन्स (Algorithmic Stablecoins)

अल्गोरिदमिक स्टेबलकॉईन्स कोणत्याही राखीव असेलच वापर करत नाहींत. त्याऐवजी ते अल्गोरिदमच्या मदतीने पुरवठावर नियंत्रण आणतात ज्याने स्टेबलकॉईन स्थिर राहतात. फ्रॅक्स (Frax) अल्गोरिदमिक स्टेबलकॉईन्सचे उदाहरण आहे.

[media url="https://www.youtube.com/watch?v=I6vwKa9lkvU"][/media]


स्टेबलकॉईन्सचे फायदे व तोटे (Advantage & Disadvantage of Stablecoins)

क्रिप्टोकरन्सी पर्याय म्हणून पहिल्या जाणाऱ्या स्टेबलकॉईन्सचे काही फायदे आहेत; तसेच काही तोटे सुद्धा आहेत.

स्टेबलकॉईन्सचे फायदे (Benefits of Stablecoins)

डिजिटल चलन (Digital Currency)

स्टेबलकॉइन्सचा पहिला फायदा म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे त्यांची देखभाल केली जाते आणि ते फार कमी कालावधीत आणि फियाट चलनांपेक्षा कमी खर्चात आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास सक्षम असतात.

शून्य अस्थिरता (Zero Volatility)

स्टेबलकॉइन्सचे स्वरूप फिएट चलन किंवा कमोडिटीशी जोडले जात असल्यामुळे, त्यांना सामान्यत: कमी किंवा जास्त अस्थिरता व्यापार कालावधी अनुभवता येत नाही ज्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांसह अधिक विश्वासार्ह चलन बनते.

बाजारांविरुद्ध हेज (Hedge against market) 

स्टेबलकॉइन्सचे स्वरूप फिएट चलन किंवा कमोडिटीशी जोडले जात असल्यामुळे, त्यांना सामान्यत: कमी किंवा जास्त अस्थिरता व्यापार कालावधी अनुभवता येत नाही ज्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या फायद्यांसह अधिक विश्वासार्ह चलन बनते.

स्टेबलकॉईन्सचे तोटे (Disadvantages of Stablecoins)

केंद्रीकरण (Centralize)

ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित होण्याच्या कल्पनेचा उत्सव साजरा करत असताना, स्टेबलकॉइन्स केंद्रीकरणाचे स्वरूप आणतात, विशेषत: जेव्हा ते मालमत्तेच्या समर्थनासाठी येते. चलनात असलेले प्रत्येक नाणे समान राखीव मूल्याद्वारे समर्थित आहे याची खात्री करण्यासाठी एका संघाची आवश्यकता असते जी ऑपरेशनला केंद्रीकृत संरचनेकडे अधिक झुकते.

पारदर्शकता (Transparent)

अनेक स्टेबलकॉइन्स त्यांच्या साठ्याबाबत पारदर्शक नसल्याबद्दल सार्वजनिकपणे बोलावले गेले आहेत. उदाहरणार्थ, टेथरने कंपनीकडे योग्य प्रमाणात राखीव रक्कम आहे की नाही याबद्दल मोठ्या प्रमाणात जनक्षोभ पाहिला आहे, ज्यामुळे यूएस सरकारने दंड आणि नियम लागू केले आहेत. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या सध्याच्या राखीव होल्डिंगचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.