Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akshaya Tritiya 2023: Sovereign Gold Bond म्हणजे काय? डिजिटल गोल्ड गुंतवणुकीचे फायदे समजून घ्या

Sovereign Gold Bond

डिजिटल स्वरुपातही तुम्ही सुवर्ण खरेदी कर शकता. त्यासाठी तुम्हाला दुकानात जायची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोव्हरिन गोल्ड बाँड इश्यू करते. हे बाँड तुम्ही खरेदी करून सोन्यामध्ये घर बसल्या गुंतवणूक करू शकता. तसेच यावर व्याजही मिळते. डिमॅट स्वरुपातील सोने तुम्ही कधीही विकू शकता. फिजिकल गोल्ड खरेदीला गोल्ड बाँड हा एक चांगला पर्याय आहे. घरात सोने ठेवून जोखीम घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड खरेदी करा.

Sovereign Gold Bond: भारतीय संस्कृतीमध्ये सूवर्ण खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ मुहूर्ताला सोने खरेदी केली जाते. आता अक्षय तृतीया जवळ येत आहे. या मुहूर्तावरदेखील अनेकजण सोने खरेदी हमखास करतात. मात्र, पारंपरिक पद्धतीने दुकानात जाऊन खरेदी करण्याशिवाय सोने खरेदीचे काही पर्याय आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. तुम्ही सार्वभौम गोल्ड रोखे (sovereign Gold bond) खरेदी करू शकता. 

गुंतवणूक करताना वैविध्य असायला हवे, असे बोलले जाते. म्हणजेच एकाच पर्यायात गुंतवणूक न करता अनेक ठिकाणी थोडीथोडी गुंतवणूक करायला हवी. त्यामुळे जोखीम कमी होते. सोन्यामधील गुंतवणूकही एक चांगला पर्याय आहे. तुमची पुढची सोने खरेदी डिजिटल होऊ शकते. मात्र, त्याआधी सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणजे काय ते समजून घ्या. 

Sovereign Gold Bond म्हणजे काय? कधी खरेदी करता येते?

सार्वभौम सुवर्ण रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) इश्यू केले जातात. या बाँड्सला सरकारची हमी असते. हे बाँड आरबीआयकडून वर्षातून सुमारे पाच वेळा इश्यू केले जातात. या आधी SGB 10 मार्च 2023 ला इश्यू करण्यात आले होते. इश्यू करण्याची शेवटची तारीख 10 मार्च होती. चालू आर्थिक वर्षातही गोल्ड बाँड इश्यू केले जातील. इश्यू तारीख तुम्ही आरबीआयच्या संकेतस्थळावर चेक करू शकता. वर्षात कधीही गोल्ड बाँड खरेदी करता येत नाहीत. जेव्हा आरबीआयकडून बाँड इश्यू केले जातात. तेव्हाच अप्लाय करून गोल्ड बाँड खरेदी करता येतात.

किती गोल्ड खरेदी करता येते? (How much worth Gold bond we can buy)

सोव्हरीन गोल्ड बाँड द्वारे तुम्ही वर्षात प्रति व्यक्ती कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता.  

गोल्ड बाँडमध्ये किती वर्षांसाठी गुंतवणूक करता येते (How many years we can invest in Gold bond)

गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असतो. मात्र, पाच वर्षांनंतर तुम्ही हे रोखे आरबीआयला पुन्हा विकू शकता.  व्याज ज्या तारखेला दिले जाते त्यावेळी तुम्ही योजना बंद करू शकता. तसेच जर 8 वर्षानंतर तुम्ही गुंतवणूक कालावधी 3 वर्षांनी वाढवू शकता. म्हणजेच एकूण 11 वर्ष गोल्ड बाँड तुम्ही खरेदी करू शकता. 1 ग्रॅम सोन्याच्या पटीत हे बाँड इश्यू केले जातात. त्यास इश्यू प्राइज असे म्हटले जाते. हे बाँड खरेदी केल्यास तुम्हाला सर्टिफिकेटही मिळते. तुम्ही बाँड खरेदी केल्याचा हा पुरावा असतो. हे बाँड तुम्ही डिमॅट खात्यातही ठेवू शकता. म्हणजेच इ-सर्टिफेकेटही मिळवू शकता.

एकदा गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास आठ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. मात्र, मॅच्युरिटी पिरियड झाल्यानंतर तेव्हाच्या सोन्याचा जो दर असेल त्यानुसार आरबीआय हे बाँड पुन्हा माघारी घेईल. सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थिती तुम्हाला गोल्ड बाँडमधून नफा होऊ शकतो. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा एक चांगला पर्याय आहे. पाच, आठ किंवा अकरा वर्षानंतर तुम्ही गोल्ड बाँड विकू शकता. मात्र, तेव्हा सोन्याचे दर जास्त आकर्षक नसतील तरीही तुम्हाला हे बाँड आरबीआयला विकावे लागतील.

  • गोल्ड बाँड खरेदी करण्याचे फायदे काय? (Benefit of Investing in SGB)
  • फिजिकल गोल्ड सांभाळण्याची गरज नाही. इ-गोल्ड तुमच्या खात्यात सुरक्षित राहील.
  • सरकारने जारी केलेले बाँड असल्याने सुरक्षिततेची चिंता नाही. 
  • जेवढे सोने तुम्ही खरेदी केले आहे त्यावर 2.5 % सहा महिन्यातून एकदा व्याज मिळेल. वर्षातून दोनदा व्याजाचा हप्ता मिळेल. 
  • गोल्ड बाँड खरेदी करताना जीएसटी भरावा लागत नाही. मात्र, दुकानातून सोने खरेदी करताना जीएसटी द्यावा लागतो. 
  • गुंतवणुकीवर कोणताही कर कापून जाणार नाही. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लागू होत नाही. 
  • डिमॅट खात्यात ठेवू शकता. त्यामुळे कधीही खरेदी विक्री करता येईल. मात्र, असे करताना कर लागू होईल.  
  • गोल्ड बाँडला गहाण ठेवून त्या बदल्यात बँकेकडून कर्ज मिळवू शकता.

सुवर्ण रोख्यांसाठी अप्लाय कसे कराल? (How to apply for sovereign gold bond)

सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अप्लाय करू शकता. तुम्ही ऑनलाइनही अप्लाय करू शकता. डिमॅट खात्यातूनही गोल्ड बाँडसाठी अर्ज करता येईल. झिरोदा आणि इतरही डिमॅट अॅप द्वारे तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. जर तुम्ही ऑनलाइन अर्ज करत असाल तर तुम्हाला डिस्काउंटही मिळू शकतो. जॉइंट होल्डिंग उपलब्ध आहे. म्हणजेच दोघे जण मिळूनही गोल्ड बाँडसाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करताना वारसदाराचे नाव द्यायला विसरू नका.

डिमॅट खात्यातून खरेदी विक्री व्यवहार करताना (How to trade Gold bond in Demat account)

अर्ज करताना तुम्ही तुमच्या डीमॅट खात्याचा क्रमांक नमूद केला तर हे बाँड तुमच्या डिमॅट खात्यात होल्डिंग सेक्शनमध्ये दिसतील. डिमॅट खात्यातील गोल्ड बाँड तुम्ही कधीही विकू शकता. अगदी शेअर्ससारखेच. पाच वर्षाच्या आधीही तुम्ही डीमॅट खात्यातील गोल्ड बाँड विकू शकता. जर खरेदीदार नसतील तर या व्यवहारात कमी फायदा किंवा तोटाही होऊ शकतो. मात्र, गुंतवणूक कधीही काढून घेण्याचा पर्याय मिळतो.

डिमॅट खात्यातून तीन वर्षाच्या आत गोल्ड बाँड विकत असाल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. तर तीन वर्षानंतर बाँड विकत असाल तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. LTCG 20% आणि त्यावर 4% सेस द्यावा लागेल. मात्र, LTCG वर इंडेक्शेशन बेनिफिट मिळेल. इंडेक्शेशन बेनिफिट म्हणजे नफा मोजताना खरेदी केलेल्या सोन्याची तत्कालीन किंमत ग्राह्य न धरता विक्री करतेवेळची महागाई लक्षात घेऊन नवी किंमत ठरवली जाते. त्यावर कर आकारला जातो. असे केल्याने नफा कमी दिसतो आणि करही कमी द्यावा लागतो.