Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Shares? शेअर्स म्हणजे काय?

What is Shares?

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतामध्ये कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केटमधूनच केली जाते.

शेअर मार्केटशी संबंधित बातम्या आपल्या कानावर नेहमीच येत असतात. जसं की, आज सेन्सेक्स (Sensex) कोसळला. शेअर मार्केटमध्ये बुलिश वातावरण होतं. निफ्टी 50 (Nifty 50) मधील काही कंपन्यांचे शेअर्स  इतक्या अंकाने खाली आले. पण या सर्वांमध्ये शेअर्स म्हणजे नेमकं काय असतं? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी आपण शेअर मार्केट म्हणजे काय, ते जाणून घेऊ.

शेअर मार्केट म्हणजे काय? What is Share Market?

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतामध्ये कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केटमधूनच केली जाते. यालाच स्टॉक एक्सचेंज म्हणतात आणि भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. ती म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).


आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्यावर येऊ, तो म्हणजे शेअर. तर शेअर या शब्दाचा अर्थ भाग किंवा हिस्सा असा होतो. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जेव्हा एखादी कंपनी उद्योग सुरू करते. तेव्हा त्या कंपनीला भांडवलाची म्हणजेच पैशांची गरज असते. म्हणजे त्याच्याकडे थोडेफार पैसे असतात. पण त्याला अधिक पैशांची गरज असते. तेव्हा तो दोन पद्धतीने पैसे मिळवू शकतो. एक म्हणजे कर्ज आणि दुसरा कंपनीच्या मालकीतील काही भाग आयपीओद्वारे (Initially Public Offer-IPO) इतरांना देणे. यातील जो काही भाग आहे;  त्याला इक्विटी शेअर म्हणजेच शेअर्स (Equity Shares / Shares) म्हणतात.

शेअर्स म्हणजे काय? What is Shares?

जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे इक्विटी शेअर्स म्हणजेच समभाग विकत घेतो. तेव्हा आपण त्या कंपनीच्या मालकीचे काही भाग विकत घेत असतो. म्हणजे शेअर्स विकत घेणाऱ्याला त्या कंपनीत  शेअर्सच्या टक्क्यांप्रमाणे मालकी हक्क प्राप्त होतो. त्याला इंग्रजीमध्ये शेअरहोल्डर (भागधारक) असं म्हणतात.

पूर्वी शेअर्स खरेदी-विक्रीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने चालायची. तुम्ही Scam 1992 ही वेबसिरीज पाहिली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की, पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आवारात बोली लावून शेअर्सची खरेदी-विक्री केली जात होती. आता ही प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे आता शेअर्सची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर डी-मॅट अकाऊंटद्वारे (Demat Account)ऑनलाईन करावी लागते. खरेदी केलेले सर्व शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यात जमा होतात. ते तुम्ही केव्हाही विकू शकता.