Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय?

भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज मार्केट (Stock Exchange Market) आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).

शेअर या शब्दाचा डिक्शनरीतील अर्थ भाग (Part) असा आहे; आणि आपण जेव्हा शेअर मार्केट (Share Market) असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ भाग विकत घेण्याची जागा असं ढोबळ मानाने म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेणं म्हणजे एखाद्या कंपनीचा भाग विकत घेणं. थोडक्यात सांगायचं झालं तर शेअर मार्केट म्हणजे असे एक सार्वजनिक मार्केट आहे; जिथे विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विकले जातात.

भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज मार्केट (Stock Exchange Market) आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE). बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) ज्याला BSE असं म्हटलं जातं. अर्थात तो बॉम्बे म्हणजेच मुंबई येथे आहे. बीएसईचा सेन्सेक्स (Sensex) हा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. सेन्सेक्स निर्देशांकामध्ये देशातील आघाडीच्या 30 कंपन्या आहेत. भारतातील दुसरा महत्त्वाचा निर्देशांक आहे, तो म्हणजे, एनएसई-नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSE चे मुख्यालाय दिल्ली येथे आहे. एनएसईच्या इंडेक्स Nifty हा निर्देशांका महत्त्वाचा आहे. या निर्देशांकामध्ये देशातील नामांकित 50 कंपन्यांचा समावेश असतो. 

सेन्सेक्स आणि निफ्टी या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्ये आणखी बरेच निर्देशांक आहेत. पण हे दोन प्रमुख निर्देशांक मानले जातात. या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्ये बेंचमार्क निर्देशांक, सेक्टरल निर्देशांक, मार्केट-कॅप आधारित निर्देशांक, बॅंकांच्या शेअर्सची स्थिती दर्शवणारा बॅंकनिफ्टी निर्देशांक, सरकारी बॅंकांसाठी पीएसयू बॅंक निर्देशांक त्याचबरोबर मेटल, फार्मसी असे सेक्टरनिहाय ही निर्देशांकाचे प्रकार आहेत.

शेअर मार्केटमधील ठळक मुद्दे

  • शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या इक्विटी शेअर्सची खरेदी विक्री केली जाते.
  • शेअर मार्केट हे फ्री-मार्केट अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे गुंतवणूकदार आणि व्यापारी लोकशाही मार्गाने व्यवहार करतात.
  • शेअर मार्केटमध्ये योग्य किमतीचा मागोवा घेऊन त्यानुसार त्याची खरेदी केली जाते.
  • इंडियन स्टॉक मार्केट सेबी म्हणजेच, सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेद्वारे नियंत्रित केले जाते.

शेअर मार्केटच्या कामाची वेळ

शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीचे कामकाज ठराविक वेळेत आणि आठवड्यातील 5 दिवस चालते. शेअर मार्केट सकाळी 9.15 वाजता सुरू होते. ते दुपारी 3.30 पर्यंत असते. या कालावधीत मार्केटमध्ये कोणताही शेअर्ची खरेदी किंवा विक्री करता येते. तर दर शनिवार,  रविवार आणि सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी शेअर मार्केटमधील सर्व व्यवहार बंद असतात.

सेबी-सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 

शेअर मार्केटला नियंत्रित करण्यासाठी सेबी ही संस्था काम करते. जसे बँकांना नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया काम करते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमधील धोके, फसवणूक, नवीन कंपन्यांची मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, कंपन्यांचा आयपीओ आणणे आणि एकूणच शेअर मार्केटमधील व्यवहार सुरळीत पार पाडणे हे सेबीचे मुख्य काम आहे.