Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) काय आहेत?

bsc sensex nifty share market shock exchange

सेन्सेक्‍स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे प्रामुख्याने शेअर मार्केटमधील (Share Market) बेंचमार्क निर्देशांक (Benchmark Index) आहेत.

सेन्सेक्‍स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे प्रामुख्याने शेअर मार्केटमधील (Share Market) बेंचमार्क निर्देशांक (Benchmark Index) आहेत. सेन्सेक्स हा बॉम्बे शेअर बाजाराशी (BSE); तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराशी (NSE) संबंधित आहे. हे दोन्ही निर्देशांक शेअर मार्केटमधील चढ-उतार निर्देशित करत असतात. एकूणच ते शेअर मार्केटची दिशा दर्शवत असल्याने त्यांना 'निर्देशांक' म्हणला जाते. प्रत्येक देशातील महत्त्वाच्या शेअर मार्केटमधील काही निवडक निर्देशांक हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिशादर्शक असतात. सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतातील सर्वात मोठे निर्देशांक आहेत. सेन्सेक्स हा बीएसईचा तर निफ्टी हा एनएसईचा मुख्य निर्देशांक मानला जातो.

सेन्सेक्स म्हणजे काय? What is Sensex?

sensex

सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा महत्त्वाचा निर्देशांक असून आहे. यामध्ये भारतातील 13 वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वोत्तम 30 कंपन्यांचा समावेश असतो. या 30 कंपन्यांच्या शेअर्समधील चढ-उतारानुसार सेन्सेक्स खाली वर होत असतो. प्रत्येक सहा महिन्यांनी सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या शेअर्सची कामगिरी पाहून त्यांना या क्रमवारीत स्थान दिले जाते. ज्या कंपन्यांचे शेअर्स सेन्सेक्सच्या निकषात बसत नाहीत ते बाहेर पडतात आणि त्या जागी नवीन कंपन्या येतात. सध्या हा निर्देशांक 55000 ते 56000 हजाराच्या दरम्यान आहे.

निफ्टी म्हणजे काय? What is Nifty?

nifty

निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा महत्त्वाचा बेंचमार्क इंडेक्स आहे. निफ्टी निर्देशांकात देशातील सर्वोत्तम 50 कंपन्यांचा समावेश असतो. त्यामुळे निफ्टी हा ‘निफ्टी 50’ या नावानेही ओळखला जातो. निफ्टीच्या इंडेक्समधील कंपन्यांची कामगिरी दर सहा महिन्यांनी चेक केली जाते. कामगिरीनुसार काही कंपन्या यातून बाहेर पडतात तर काही नव्याने येतात. निफ्टीचे स्थापना वर्ष 1996 असून सध्या हा 15000 ते 16000 च्या दरम्यान आहे.

शेअर मार्केटमध्ये आणखी निर्देशांक असतात का?

सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकामध्ये जवळपास सारख्याच कंपन्यांचा समावेश होतो. पण, सेन्सेक्समध्ये भारतातील सर्वोत्तम 30 कंपन्यांचा समावेश होत असल्याने याचा निर्देशांक अधिक सिलेक्टीव्ह मानला जातो. सेन्सेक्स आणि निफ्टी या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्ये बरेच निर्देशांक आहेत. पण याचे प्रामुख्याने बेंचमार्क निर्देशांक, सेक्टरल निर्देशांक आणि मार्केट-कॅप आधारित निर्देशांक असे 3 प्रकार मानले जातात. मग त्याव्यतिरिक्त बॅंकांच्या शेअर्सची स्थिती दर्शवणारा बॅंकनिफ्टी निर्देशांक, सरकारी बॅंकांसाठी पीएसयू बॅंक निर्देशांक त्याचबरोबर मेटल, फार्मसी असे सेक्टरनिहाय ही निर्देशांकाचे प्रकार आहेत.

निर्देशांकामधील कंपन्यांच्या दररोजच्या स्थितीवरून शेअर मार्केटमध्ये अंदाज व्यक्त केले जातात. काही शेअर मार्केटमधील काही तज्ज्ञ या निर्देशांकांचा मागील काही वर्षांचा अभ्यास करून त्यावर सध्याच्या मार्केटमधील स्थितीचे अंदाज व्यक्त करत असतात.