अभिनंदन !!! वयाचे अर्धशतक (Half Century) पूर्ण करताय. थोडेसे केस करडे (Grey) होताहेत, पण फिटनेस छान राखलाय तुम्ही. आजपर्यंतचा सगळा काळ तुम्ही तुमचे आई-वडील, आयुष्याचा जोडीदार आणि तुमच्या मुलांकरिता दिला आहे आणि अजून देखील देता आहातच. निश्चितच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खरोखर कठोर परिश्रम केले आहेत आणि म्हणून तुम्ही आता तुमच्या सेवानिवृत्तीचा आनंद घेण्यास देखील deserve करता ना!! स्वतःच्या पन्नाशीमध्ये स्वतःच स्वतःला तुम्ही एक गिफ्ट नक्कीच देऊ शकाल. सिनिअर सिटीझन टर्म इन्शुरन्स प्लॅन (Senior Citizen Term Insurance Plan) म्हणजेच ज्येष्ठ नागरिक मुदत विमा योजना. वयानुसार, प्रीमियमची रक्कम थोडी जास्त वाटेलही. परंतु त्याचे फायदे नक्कीच खर्चापेक्षा जास्त असतात.
टर्म इन्शुरन्स प्लॅन जोडीदारासाठी उत्पन्नाचा स्त्रोत
ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्यासाठी डिझाईन केलेला हा “टर्म इन्शुरन्स प्लॅन” तुमच्या जोडीदारासाठी उत्पन्नाचा स्रोत म्हणून देखील भूमिका बजावू शकतो. तुमची जोडीदार व्यक्ती तुमच्यावर अवलंबून असेल, तर तुमच्यापश्चात तिचे जीवन आर्थिकदृष्ट्या परावलंबी होऊ नये, तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व स्वाभिमानाने आणि प्रतिष्ठेने जपत राहता यावे, या उद्देशाने “सिनिअर सिटीझन टर्म इन्शुरन्स प्लॅन” डिजाईन केलेला असतो. किंवा कदाचित तुमची मुले अजून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतील, तर त्यांना देखील ते “कमावते” होईपर्यंत स्वतःची काळजी घेण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळू शकेल. घेतलेले परंतु परतफेड न होऊ शकलेले कर्ज देखील डेथ-क्लेम अमाउंटच्या मदतीने चुकवता येऊ शकते आणि एकूणच कुटुंबाला सन्मानाचे आणि कर्जमुक्त जीवन व्यतीत करता येते.
कुटुंबियांना आर्थिक जबाबदारीतून मुक्त ठेवते
तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेविषयी सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही मालमत्ता कर किंवा कायदेशीर शुल्काची किंमत कव्हर करण्यासाठी “वारसा” (estate) म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना मोठी रक्कम देऊ शकता. काही व्यक्ती स्वतःची काही तत्वे जपत, स्वाभिमानाने स्वतःचे संपूर्ण आयुष्य उपभोगू इच्छित असतात. अशा व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांवर, कुटुंबियांवर अंत्यसंस्काराच्या खर्चाचा भार देखील टाकायचा नसतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेली टर्म-इन्शुरन्स पॉलिसी कुटुंबियांना येऊ शकणाऱ्या आर्थिक जबाबदारीतून मुक्त ठेवते. याव्यतिरिक्त सर्वच टर्म-इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे, “सिनिअर सिटीझन टर्म इन्शुरन्स प्लॅन”साठीच्या केलेल्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स ऍक्ट, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स वजावट (deduction) म्हणून क्लेम करू शकता. एवढेच नव्हे तर, तुमच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना मिळणारे मृत्यू लाभ पेआउट (Death Claim Amount) देखील प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे.
सिनिअर सिटीझन टर्म इन्शुरन्ससाठी कमाल वय 60
सिनिअर सिटीझन टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्यासाठी सर्वसाधारण कमाल वय 60 आहे, परंतु हे इन्शुरन्स कंपनी-परत्वे, त्यांच्या प्लॅन-परत्वे निरनिराळे असू शकते. बहुतेक पॉलिसीची मॅच्युरिटी वयाची 80 वर्षे , तर काही पॉलिसीजमध्ये 85 किंवा त्याही पेक्षा अधिक असते. काही कंपन्या 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी “अनलिमिटेड टर्म प्लॅन” देखील ऑफर करतात, ज्यामध्ये पॉलिसीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला 125% पर्यंत प्रिमिअम परत केला जातो. काही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग “सिनिअर सिटीझन लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज”मध्ये गंभीर आजार देखील कव्हर केले जातात. बहुतेक सर्वच इन्शुरन्स कंपनीज् तुम्हाला मेडिकल अर्थात वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करतात. तथापि, काही कंपनीज् “मेडिकल हिस्ट्री” देखील पुरेशी असते.
तुम्ही वय वर्षे 50 पेक्षा अधिक असल्यास “सिनिअर सिटीझन टर्म-इन्शुरन्स प्लॅन” खरेदी करणे, खूप जास्त फायद्याचे असेल. आजकाल term plan ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येत असल्याने “पॉलिसी खरेदीची प्रक्रिया” अगदी एका क्लिकवर पूर्ण होते. खरे चॅलेंज असते, ते “योग्य पॉलिसीची निवड करणे”. BankBazaar.com किंवा Policybazaar.com सारख्या मार्गदर्शक sites तुम्हाला विविध कंपन्यांच्या “सिनिअर सिटीझन टर्म-इन्शुरन्स प्लॅनस्”ची तुलना करून दाखवतात आणि योग्य ती पॉलिसी निवडायला देखील मदत करतात.