Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टर्म इन्‍शुरन्‍स म्हणजे काय? | What is Term Insurance?

टर्म इन्‍शुरन्‍स म्हणजे काय? | What is Term Insurance?

Term Insurance आपल्या अकाली मृत्यूच्या बाबतीत आपल्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे.

टर्म इन्‍शुरन्‍स (Term Insurance) ही एक जीवन संरक्षण विमा योजना आहे. जी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाच्या अकाली मृत्यूच्या जोखमीवर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण देते. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्याकडे Term Insurance असणं गरजेचं आहे. Term Insurance आपल्या अकाली मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. इतर विम्यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रीमियम असूनही भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे. टर्म इन्शुरन्स हा आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार आहे.

कायमस्वरूपी जीवन विम्याच्या तुलनेत मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) खूपच कमी खर्चिक असतो आणि यातून विमाधारकाच्या कुटुंबियांना रोख मूल्याशिवाय इतर काही मिळत नाही. मुळात मुदत विम्यामध्ये रोख मूल्याशिवाय इतर कोणतेच मूल्य नसते. पॉलिसीद्वारे हमी दिलेला मृत्यू लाभ हे एकमेव मूल्य आहे.

टर्म इन्शुरन्सची महत्त्वाची वैशिष्ट्ये

1. मुदत विमा (Term Insurance) हा जीवन विमा पॉलिसीचा एक प्रकार आहे जो विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट "टर्म" वर्षांसाठी सुरक्षितता पुरवतो.
2. मुदत पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास आणि पॉलिसी सक्रिय असल्यास मृत्यू लाभ (Death Benefit) दिला जातो.
3. अनेक टर्म पॉलिसी पॉलिसीच्या कालावधीसाठी लेव्हल प्रीमियम ऑफर करतात.
4. काही पॉलिसी ठराविक वर्षानंतर कंपनीच्या नियमानुसार फायदे कमी करतात किंवा वाढवून देतात. 
5. तसेच मुदत विमा पॉलिसीचे कायमस्वरूपी विम्यामध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय ही काही कंपन्या देतात.

टर्म इन्शुरन्स कशासाठी?

टर्म इन्शुरन्स हे घरातील किंवा कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबियांच्या आर्थिक गरजा व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची एक सुविधा आहे. टर्म इन्शुरन्सद्वारे घरातील कर्त्या व्यक्तीच्या जीवन मूल्याइतक्या रकमेची शाश्वती देणारा पर्याय आहे. यातून कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करता येऊ शकतात. 

टर्म इन्शुरन्सचे प्रकार

टर्म इन्शुरन्सचे विविध प्रकार आहेत. पॉलिसीधारकाच्या गरजेनुसार प्रत्येक पॉलिसीचे फायदे आणि तोटे असतात.

परिवर्तनीय मुदत (Convertible Term)

परिवर्तनीय टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी, म्हणजेच परिवर्तनीय विमा याचा सर्वांत मोठा फायदा असा आहे की, पॉलिसीधारकाला वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही. जेव्हा ही टर्म पॉलिसी कायमस्वरूपी विम्यामध्ये बदलायला जातो, तेव्हा पॉलिसीधारकाच्या आरोग्य स्थितीचा विचार केला जात नाही.

समपातळी मुदत (Level Term)

यामध्ये पूर्वी ठरविलेल्या रकमेच्या मुदतीच्या विम्याचा हप्ता कायम राहतो. ह्यामुळे प्रत्येक नूतनीकरणाला वाढता हप्ता देण्याची वेळ येत नाही. सर्व साधारणपणे हा मुदत विमा 5 ते 30 वर्षाच्या मुदतीमध्ये उपलब्ध असतो.

वाढीव मुदत (Increasing Term)

काही पॉलिसी वेळेनुसार मृत्यू लाभ (Death Benefit) वाढवण्याची परवानगी देतात. पण त्यानुसार पॉलिसीच्या प्रीमियममध्ये वाढ होते. पण  देखील वाढतो, परंतु ते पॉलिसीधारकांना आयुष्याच्या सुरुवातीस कमी प्रीमियम भरण्याची परवानगी देते जेव्हा त्यांच्याकडे भरपूर बिले आणि खर्च असतात. पारंपारिक मुदतीच्या विम्याप्रमाणेच वाढीव मुदत वाढीव लाभ मिळविण्यासाठी मोठ्या वयात दुसर्‍या पॉलिसीसाठी पात्र होण्यापासून प्रतिबंधित करते.

विमा कमी करत जाणे (Mortgage Term or Decreasing Term)

यामध्ये जसजशी वर्षे उलटत जातात आणि विम्याची गरज कमी होऊ लागते तसतशी विम्याची रक्कम कमी होऊ लागते. जेव्हा एखाद्या विमा धारकाने दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले असेल, उदा: घरा साठी कर्ज, तेव्हा अशी पॉलिसी घेतली जाते. इथे कर्ज पूर्ण परतफेड होण्या आधीच त्या धारकाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. म्हणून जितकी कर्जाची रक्कम असेल तितकी विमा पॉलिसी घेतली जाते म्हणूनच कर्जदाराचे कर्ज फेडण्या आधीच देहावसान झाले तर विम्याची रक्कम कर्जाची पूर्तता करण्याकडे वापरली जाते. ह्या विम्याची मुदत कर्जफेडीच्या मुदती इतकीच असते. जसजसे कर्ज परत फेडले जाते तसतशी विम्याचे संरक्षण पण कमी कमी होत जाते.

ई- मुदत (E-Term)

सध्या काही विमा कंपन्यांनी वाजवी हप्त्या मध्ये मुदत विम्याची उपलब्धता ‘इ –मुदत ठेव’ म्हणून केलेली आहे. अशा प्रकारच्या पॉलिसी स्वस्त असतात कारण ह्या मध्ये एजंटचे कमिशन नसते.

वरीलपैकी कोणतीही पॉलिसी घेताना त्याबाबतची कागदपत्रे आणि नियम नीट वाचून घ्या. तुम्हाला त्याच्यातील ज्ञान नसेल तर ओळखीच्या इन्शुरन्स एजंटकडून ते समजून घ्या. कारण आपण घर खरेदी करताना किंवा आपल्या मुलाचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी जेवढी काळजी व माहिती घेतो तेवढीच इन्शुरन्स खरेदी करताना घ्यायला हवी.