Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Mutual Fund म्हणजे काय? रिटायरमेंटसाठी हा योग्य पर्याय आहे का?

Retirement Mutual Fund

Retirement Mutual Fund known as Pension Fund : रियायरमेंट फंड हा पेन्शन फंड म्हणूनही ओळखला जातो. रिटायरमेंट फंड हे असे फंड आहेत; जे गुंतवणुकीतील एक विशिष्ट भाग गुंतवणूकदाराच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवतात.

उतारवयातील रिटायमेंट प्लॅनिंगसाठी बचत करण्याचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत; ज्यात सरकारची पेन्शन योजना, जीवन विमा योजना इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. या पारंपारिक पद्धतींव्यतिरिक्त म्युच्युअल फंड हाऊसने देखील रिटायमेंटच्या बचतीची गरज लक्षात घेऊन, रिटायरमेंट प्लॅनिंगची पूर्तता पूर्ण होईल असे फंड सुरू केले आहेत. पेन्शन किंवा रिटायरमेंट फंड (Pension or Retirement Fund) हे गुंतवणूकदारांना त्यांच्या उतारवयातील आर्थिक बाबींची पूर्तता करणारी एक पद्धतशीर योजना आहे. जी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रिटायरमेंटमधील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते.

रिटायरमेंटसाठी विविध प्रकारच्या योजना (Various Schemes for Retirement Planning)

डेब्ट फंड (Debt Fund)

डेब्ट प्रोफाईलमध्ये पूर्णपणे गुंतवणूक करणारी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे; जी अत्यंत सुरक्षित आणि अशाप्रकारच्या गुंतवणुकीसाठी आदर्शवत मानली जाते.

युनिट लिंक्स प्लॅन्स (Unit Links Plans)

युलिप म्हणजेच युनिट लिंक्स प्लॅन्समध्ये गुंतवली जाणारी रक्कम ही इक्विटी आणि डेब्ट प्रोफाईलमध्ये समान पद्धतीने गुंतवली जाते. यामध्ये जोखीम जरा जास्त असल्यामुळे परतावा सुद्धा अधिक मिळू शकतो.

हायब्रीड फंड (Hybrid Fund)

गुंतवणूकदार राष्ट्रीय पेन्शन योजनांसारख्या सरकारने ऑफर केलेल्या हायब्रीड फंडाची देखील निवड करू शकतात. या योजना प्राधान्यानुसार डेब्ट आणि इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देतात. साधारणत: हे फंड गुंतवणूकदाराला सेवानिवृत्तीच्यावेळी गुंतवणूक केलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढण्याची परवानगी देतात आणि उर्वरित 40 टक्के रक्कम ही वर्षभरात देण्यासाठी राखीव ठेवली जाते. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा सरकारशी संबंधित रिटायरमेंट स्कीम्स या टॅक्स फ्री आहेत. त्यावर टॅक्स आकारला जात नाही.

हायब्रीड पेन्शन फंड / रिटायरमेंट फंड हे वेगवेगळ्या फंड हाऊसद्वारे सुरू आहेत.


रिटायरमेंट फंडचा उद्देश (Purpose of Retirement Fund)

बहुतेक पेन्शन फंड (Retirement Fund) हे एकतर मासिक, वार्षिकी किंवा एकरकमी परतावा देतात. त्याचबरोबर अशाप्रकारच्या फंडमधून प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम मिळते आणि यात वाढत्या महागाईचा विचार करून ती त्या पद्धतीने संरक्षित केलेली असते. एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना रिटायरमेंटच्यावेळी एकूण जमा झालेली संपूर्ण रक्कम काढता येते.

रिटायरमेंट / पेन्शन फंडाची वैशिष्ट्ये (Features of Retirement / Pension Fund)

Features of Retirement Fund

कमी जोखीम (Low Risk)

पेन्शन प्लॅन / म्युच्युअल फंड रिटायरमेंट प्लॅनमध्ये इतर स्कीमपेक्षा कमी जोखीम असते. त्यामुळे सेवानिवृत्तांसाठी (Retirement) हा एक गुंतवणुकीचा चांगला स्रोत आहे. रिटायरमेंट म्युच्युअल फंडमधील निधी प्रामुख्याने सरकारी रोखे आणि सिक्युरिटीजसारख्या कमी जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवतात. जेणेकरून गुंतवणूकदारांना स्थिर परतावा देता येईल.

हायब्रीड पेन्शन प्लॅन (Hybrid in Nature)

म्युच्युअल फंड कंपन्यांनी हायब्रीड पेन्शन योजना ऑफर करण्यास सुरुवात केली. या योजनांमधील गुंतवणूक डेब्ट आणि इक्विटी मार्केटमध्ये (Debt & Equity Market) केली जाते. यामधील इक्विटीमध्ये साधारणतः 40 ते 50 टक्के गुंतवणुकीचे प्रमाण ठेवले जाते.

पैसे काढण्याची मुभा (Withdrawal Condition)

वयाच्या 58 ते 60 वर्षाच्या कालावधीत म्हणजेच निवृत्तीपूर्वीच रिटायरमेंट फंडमधून निधी काढता येतो. गुंतवणूकदार या स्कीममधून एकरकमी रक्कम काढू शकतात किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम काढू शकतात.

लिक्विडिटी (Liquidity)

पेन्शन फंडमध्ये लिक्विडिटी साधारणतः कमी असते. कारण गुंतवणूकदाराने मुदतीपेक्षा लवकर पैसे काढले तर त्यावर शुल्क आकारले जाते आणि त्याचा एक्झिट भार जास्त असतो. कोणतीही स्कीम खरेदी करताना गुंतवणूकदाराने सर्व माहिती मिळवली पाहिजे.

लॉक-इन कालावधी (Lock in Period)

रिटायरमेंट म्युच्युअल फंडाचा लॉक-इन कालावधी हा ELSS फंडाच्या कालावधीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे रिटाररमेंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला किमान 5 वर्षे त्यातील रक्कम काढता येत नाही. परिणामी गुंतवणूकदाराला कंपाउंडिंगचा अतिरिक्त लाभ मिळतो. 

रिटायरमेंट फंडचे फायदे (Benefits of Retirement Fund)

Benefits of Retirement Fund

फ्लेक्सिबल (Flexible)

म्युच्युअल फंडाच्या सेवानिवृत्ती उत्पादनांचा मुख्य फायदा म्हणजे एनपीएस किंवा इतर कोणत्याही सेवानिवृत्ती विमा पॉलिसींप्रमाणे, एखाद्याला सक्तीने वार्षिकी खरेदी करण्याची गरज नाही. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक गरजा आणि योजनांवर अवलंबून एकतर एकरकमी रक्कम काढू शकतो किंवा मासिक वार्षिकी निवडू शकतो. 

टॅक्स सवलत (Tax Benefit) 

रिटायरमेंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80CCC अंतर्गत 1.5 लाखापर्यंत टॅक्स सवलत मिळू शकते. पण गुंतवणूकदारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या स्कीममधून काढली जाणारी रक्कम ही टॅक्सच्या अधीन असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला यातून मिळणाऱ्या रकमेवर पगाराच्या उत्पन्नाप्रमाणेच वैयक्तिक स्लॅब दरावर लागू होणारा टॅक्स लागू शकतो.

दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment)

हे फंड दीर्घकालीन बचत योजना आहेत, कारण त्यांचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांच्या निवृत्तीनंतर उत्पन्नाची स्थिरता प्रदान करणे आहे. बाजारातील कमी जोखमीच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

विमा संरक्षण (Insurance Cover)

बहुतेक पेन्शन पॉलिसी जीवन विमा संरक्षण म्हणून काम करतात. निवृत्तीपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना किंवा नॉमिनीला यातून आर्थिक संरक्षण मिळते. तसेच, काही स्कीम्स या वैद्यकीय अडचणीच्या वेळी यातून एकरकमी रक्कम काढण्याची परवानगी देतात.

महागाईपासून संरक्षण (Protection against Inflation)

बहुतेक सेवानिवृत्ती फंड महागाईविरूद्ध काही भरपाई देतात. हे गुंतवणूकदारांना निवृत्तीनंतर जमा झालेल्या कॉर्पसपैकी एक तृतीयांश पैसे काढण्याची परवानगी देऊन महागाईपासून संरक्षण करतात. तर शिल्लक राहिलेल्या रकमेचा वापर गुंतवणूकदाराला मासिक स्वरूपात दिला जातो.

जोखीम-मुक्त गुंतवणूक (Risk Free Investment)

पेन्शन फंड सेवानिवृत्ती योजना सर्वात सुरक्षित गुंतवणूक पद्धतींपैकी एक आहे. कारण ते अत्यंत कमी-जोखीम असलेल्या प्रोफाईलमध्ये गुतंवणूक करतात. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे निश्चित परताव्यासह देण्यासाठी या योजनेमधील निधी सुरक्षित व अधिक परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवले जातात.

रिटायरमेंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची?

रिटायरमेंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे मुख्यतः दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग यात एकरकमी गुंतवणूक करण्याचा आणि दुसरा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करण्याचा. SIP द्वारे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक अशा कालावधीने ठराविक रक्कम भरण्याची मुभा मिळते.

म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे दिली जाणारी रिटायरमेंट योजना ही सेवानिवृत्तीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या स्कीममध्ये पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. जो सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधीपेक्षा खूपच कमी आहे.